देशिकेंद्र विद्यालयातील 1984 च्या बॅच चे विद्यार्थी तब्बल 40 वर्षानंतर ‘आम्ही मित्र एकत्र ‘ आगळा वेगळा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला.
वर्गमित्र खासदार डाॅ.शिवाजी काळगे यांचा केला गौरव
लातूर (वृत्तसेवा )तब्बल ४० वर्षानंतर वर्गमित्रांनी ‘आम्ही मित्र एकत्र’ अगळा वेगळा उपक्रम साजरा करत गुरुजनांचा गौरव व वर्गमित्र खा. डॉ. शिवाजी काळगे यांचा सत्कार संपन्न झाला.
देशिकेंद्र विद्यालय लातूर येथील 1984 च्या दहावी वर्गातील विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या क्षैत्रात स्थिरावले असताना आपला वर्गमित्र डाॅ.शिवाजी काळगे खासदार झाल्याचा आनंदाने त्यांचा सत्कार करावा व गुरुजनांचा ही सत्कार करावा या उद्देशाने लातूर शहरात वास्तव्यात असलेल्या मित्रांनी सोशल मिडियाच्या माध्यमातुन वर्गमित्रांना एकत्र करुन स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 21 जुलै रोजी हाॅटेल अरोमा येथे 40 वर्षानंतर आम्ही मित्र एकत्र गुरुपुजन खा.शिवाजी काळगे यांचे अभिनंदन व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर खा.डाॅ.शिवाजी काळगे,शिक्षकबुरांडे,गुडे,लवटे,वाघमारे,करपे,निला,बिडवे,व्हलकंबे,बि.पी.कुलकर्णी,महाजन,कारभारी, कत्राळे, विभुते आदी गुरुजन वर्ग उपस्थित होते.

प्रारंभी खा.डाॅ.शिवाजी काळगे व उपस्थित गुरुजनांच्या हस्ते यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन उदघाटन झाले.
गुरु पोर्णिमेनिमित्य गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.तर लातूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेले डाॅ शिवाजी काळगे यांचा सत्कार वर्गमित्रांच्या हस्ते सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात सुनिल देशपांडे यांनी 40वर्षानंतर आम्ही मित्र एकत्र या कार्यक्रमाच्या आयोजना मागील भुमिका विषद करताना म्हणाले की, 1984 ची 10ची बॅच ही अस्मरणीय होती दहावी नंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षैत्रात राज्य व राज्याबाहेर स्थिरावला होता अनेक वर्ग मित्र डाॅक्टर, ईंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक उद्योजक तर काहींनी सामाजिक क्षैत्रात आपले वेगळे वलय निर्माण केले आहे परंतू या सर्वांना एकत्र करण्याचा योग आला तो वर्ग मित्र खा डाॅ.शिवाजी काळगे लोकसभा निवडणूकित विजयी झाले आपला वर्ग मित्र खासदार झाला यांचा आनंद झाला वर्गमित्राचा सत्कार करावा व या साठी दहावी वर्गातील मित्रांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सपर्क करुन ग्रुप तया केला व दहावी नंतर तब्बल 40 वर्षानंतर वर्गमित्रांना एकत्र भेटण्याचा योग आला गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून गुरुजनांचे पुजन व खासदार मित्राचेही अभिनंदन करावे याउद्देशाने स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगीतले.

सतिश बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील आठवणीतले वेगवेगळे किस्से सांगून वर्ग मित्र डाॅ.शिवाजी काळगे यांना खासदारकीचे तिकिट मिळवण्यासाठी 2014 पासुन केलेले प्रयत्न व तिकिट मिळण्यापासुन ते निवडणूकितील विजयी निकालापर्यंतचा इतिहास वर्गमित्रासमोर सादर केला.
वर्गमित्राशी संवाद साधताना खा.डाॅ शिवाजी काळगे म्हणाले “नेते,कार्यकर्ते व प्रत्येक व्यक्ती पाठीशी उभे राहत नाहीत तोपर्यंत निवडणूक जिंकणे शक्य नाही,माझ्या विजयासाठी मतदारांनी दिलेल्या आशिर्वादाची परतफेड करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे”.यासाठी संर्वांची साथ हवी आहे. देशिकेंद्र विद्यालयातील दहावी वर्गातील वर्गमित्र तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र आलो याचा आनंद वेगळाच असल्याचे सांगून डॉ. शिवाजी काळगे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.40 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आलो याचा आनंद वेगळाच आहे.पुर्वीच्या काळातील शिक्षणाने मला मोठे केले आहे.शिक्षकांनी शुध्द प्रामाणिक हेतूने शिक्षण दिले ते ऋण फेडू शकत नाही सर्वाचे अशिर्वाद हेच माझे मोठे बळ आहे.त्यावेळेसच्या गुरु शिष्याच्या नात्याला तोड नाही. विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा वचक राहणे हे काळाची गरज आहे परंतु आज जे विद्यार्थी घडत आहेत याला पालक व समाज यांचाही दोष असल्याचे सांगीतले.आम्ही मित्र एकत्र कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल वर्गमित्राचे अभिनंदन करुन आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन सुनिल देशपांडे यांनी तर आभार विश्वास लातूरकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिरुध्द कुर्डुकर, विश्वास लातुरकर, उदय देशपांडे,सुनिल देशपांडे,जयराज लखादिवे, यहीया कासेरी, रावळे बालाजी, बाळासाहेब मस्के पाटिल,डाॅ.सतीश हंडरगुळे, अमरनाथ बिडवे,सुधिर कानडे, सतिश चलवा मिलिंद बिलोलीकर यांच्यासह लातुर शहरातील वर्गमित्रांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्नेहमिलन कार्यक्रमास जवळपास १५० वर्गमित्र सहभागी झाले होते.