जनतेच्या हिताचे निर्णय होवून
अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी होईल
ना. अमित विलासराव देशमुख
मुंबई, दि. ३ मार्च
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनतेच्या हिताचे निर्णय होवून आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मांडलेल्या योजना आणि विधेयके चर्चेअंती मंजूर होतील अशीभावना, राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
गुरूवार दि. ३ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ना. अमित विलासराव देशमुख सकाळी सहकार्यांसह ते विधानभवनात उपस्थित राहिले.
महाराष्ट्राने आणि देशाने तब्बल दोन वर्ष कोरोना महामारीच्या संकटासोबत यशस्वी लढा दिल्यानंतर आता वातावरण निवळू लागले आहे, या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आणि विधेयके मांडली जातील, त्यावर सांगोपांग चर्चा होऊन त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल असे ना. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर जनतेच्या समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षाकडून पुढाकार घेतला जाईल, त्यावर सभागृहात सकारात्मक चर्चा होईल, शासनाच्यावतीने सर्व प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन जनतेच्या हिताचे निर्णयही घेतले जातील. एकंदरीत अधिवेशन यशस्वी होईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
—————————-