28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमनोरंजनअमरप्रेमची कहाणी

अमरप्रेमची कहाणी

सिनेमा सिनेमा

‘अमर प्रेम ‘ भावस्पर्शी सुवर्ण महोत्सवी कलाकृती : 28 जानेवारी 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या अमर प्रेम चा प्रवास 50 वर्षाचा झाला

“ये लो फिर तुम्हारी आखों मे पानी ! मैने तुमसे कितनी बार कहा है कि पुष्पा मुझसे ये आंसू नही देखे जाते , आई हेट टियर्स !” हा राजेश खन्नाच्या तोंडी असणारा संवाद सिनेरसिकांच्या स्मरणात आजही आहे.
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वोत्तम चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटाची गणना होईल असा हा चित्रपट , हृदयात कायमचे कोरले गेलेलं हे अमरप्रेम!!
अमर प्रेम शक्ती सामंता दिग्दर्शित १९७२ सालची अप्रतिम कलाकृती जी लेखक बिभूतीभूषण बंडोपाध्याय
यांच्या बंगाली लघुकथा ‘हिंगर कोचुरी ‘ आणि बंगाली चित्रपट ‘निशी पदम ‘ यावर बेतलेला आहे .
काही काही वेळा सख्या किंवा रक्ताच्या नात्यापलीकडची नाती सुद्धा केवळ प्रेम , विश्वास , भावनिक संबंध , परस्परांना वाटतं असलेला आधार यामुळे श्रेष्ठ बनतात . हा चित्रपट आयुष्यात एकाकी पडलेला व्यावसायिक आनंदबाबू (राजेश खन्ना ) , जबरदस्तीने वेश्या व्यवसायात आलेली पुष्पा (शर्मिला टागोर ) आणि सावत्र आईच्या त्रासामुळे आईच्या प्रेमाला मुकलेला नंदू (विनोद मेहरा) यांच्यामधल्या अनोख्या नात्यामुळे श्रेष्ठ ठरतो.

पंचमदा यांनी या चित्रपटाला दिलेले संगीत म्हणजे संगीतप्रेमींसाठी पंचपक्वान्नच आहे . एकापेक्षा एक सरस गाण्याची मेजवानीच आहे मग ते लताचे ‘ रैना बीत जाये ” असेल किंवा शांत हळुवार नदीच्या प्रवाहाप्रमाणे जाणारे किशोरचे ‘चिंगारी कोई भडके तो सावन ऊसे बुझाये ‘ ; ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ क्यू हुआ जब हुआ तब हुआ ‘ या गाण्याची तर मजाच वेगळी आहे , लताचे छोट्या नंदू साठी गायलेलं ‘ बडा नटखट है ये ‘ तसेच किशोरचे एक भावनाप्रधान गाणे ‘ कुछ तो लोग कहेंगे लोंगो का काम है कहना ‘ ही सर्व गाणी चिरकाल आहेत .

ह्या चित्रपटाचा शेवट मन हेलावून टाकणारा आहे , दुर्गापूजेच्या दिवशी लोक दुर्गामातेला पूजनासाठी घरी घेऊन जात आहेत तर दुसरीकडे नंदू म्हणजे च विनोद मेहरा आपल्या मानलेल्या आईला शर्मिला टागोरला आपल्या घरी कायमचे सांभाळण्यासाठी घेऊन जात आहे , आय हेट टियर्स म्हणणाऱ्या राजेश खन्नाच्या डोळ्यात दोघांना निरोप देताना मात्र खरे खुरे टियर्स येतात .

भारतीय साहित्यविश्वातील एका हृदयस्पर्शी कथेवर निर्माण झालेली आणि नात्यांच्या पलीकडे जाऊन नाती जपणारी ‘ अमर प्रेम’ ही कलाकृती श्रेष्ठ ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]