16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडीअभिमन्यू पवारांनी राज्यात प्रथमच 'पॉवर ऑन व्हील' ही राबविली संकल्पना

अभिमन्यू पवारांनी राज्यात प्रथमच ‘पॉवर ऑन व्हील’ ही राबविली संकल्पना

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी ‘पॉवर ऑन व्हील’ ठरणारा नवसंजीवनी
…..

राज्यात प्रथमच औसा मतदारसंघात प्रयोग..

नादुरुस्त रोहित्र दुरुस्त होईपर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध होणार ट्रॉलीतील रोहित्र

औसा :- ( माध्यम वृत्तसेवा) -अनेकदा रोहित्र नादुरुस्त किंवा जळाल्यावर तो रोहित्र दुरुस्त होऊन यायला वेळ लागतो. या दरम्यान पाण्याविना शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. जर शेतकऱ्याला मूळ रोहित्र दुरुस्ती होऊन येईपर्यंत पिकाला एखादे पाणी मिळाले तर शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमदार अभिमन्यू पवारांनी राज्यात प्रथमच ‘पॉवर ऑन व्हील’ ही संकल्पना राबविली आहे.

यामध्ये एका ट्रॉलीवर १०० एचपीचा रोहित्र बसवलेला असून आणीबाणीच्या काळात शेतकऱ्यांनी ही ट्रॉली घेऊन जाऊन पिकाला पाणी देण्यापूरती लाईट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता रोहित्र नादुरुस्ती मुळे एकाही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही. राज्यात प्रथमच सुरू होत असलेल्या या अभियानाचे लोकार्पण औसा तालुक्यातील किल्लारी येथे आमदार अभिमन्यू पवारांच्या हस्ते शनिवारी (दि.१२) रोजी महावितरणच्या अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

                       ओव्हरलोडमुळे ग्रामीण भागातील रोहित्री बर्‍याच वेळा खराब होतात, खराब झालेले रोहित्री दुरुस्त होऊन शेतकऱ्यांना मिळायला आठवडा किंवा कधीकधी १ महिनाही वेळ लागतो. तेवढे दिवस शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यातून मार्ग काढण्यासाठी आ अभिमन्यू पवार यांनी २ वर्षांपूर्वी पॉवर ऑन व्हील ही संकल्पना मांडली होती.ऐन सुगीच्या काळात लोड येऊन अनेकदा रोहित्र जळतात. हे रोहित्र दुरुस्त होऊन यायला कधी कधी आठ आठ दिवस लागतात. त्यामुळे कमी कालावधीची पिके जसेकी कोथिंबीर, टरबूज, खरबूज, भाजीपाला, जनावरांना पिण्यासाठीचे पाणी यावर मोठा परिणाम होतो. या पिकांना दररोज पाणी लागत असल्याने पाण्याअभावी पिके करपून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तर जनावरांना पाणी उपलब्ध नसल्याने मुक्या प्राण्यांचे हाल होतात. ही बाब आमदार अभिमन्यू पवारांनी लक्षात घेऊन महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता, टेक्निकल विभागातील अधिकारी व तज्ज्ञांची बैठक घेऊन यावर काय उपाययोजना करता येईल हे तपासले. या सर्वांच्या विचारविनिमयातून टेक्निकल विभागाने एक कोणत्याही ट्रॅक्टरला सहज जोडली जाणारी ट्रॉली तयार करून त्यावर १०० एचपीचे रोहित्र बसविण्यात आले. ही ट्रॉली फक्त शेतकऱ्यांनी मूळ रोहित्र असलेल्या ठिकाणी उभी करायची. लाईनम ट्रॉलीतील रोहित्राचा सप्लाय शेतकऱ्यांच्या मोटारीला होणाऱ्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ताराना जोडून विद्युत पुरवठा सुरू करतील. या ट्रॉलीतील रोहित्राला लांब वायर व सर्व यंत्रणा जोडण्यात अली असल्याने विद्युत पुरवठा करतांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच हे रोहित्र बनविताना व ते ट्रॉलीत बसविताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याने हे चालते फिरते रोहित्र शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारे व महावितरण विभागात सुवर्णाक्षरांनी नोंद करणारे ठरणार आहे.

महावितरणच्या प्रत्येक विभागात असे किमान २ फिरते रोहित्री उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

पॉवर ऑन व्हील अंतर्गत असे ८ रोहित्री तयार करण्यात आले असून त्यातील २ रोहित्रीचे दसर्‍याच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले तर उर्वरित ६ फिरते रोहित्री शेतकऱ्यांच्या सेवेत लवकरच रुजू होणार आहेत. महावितरणच्या प्रत्येक विभागात असे किमान २ फिरते रोहित्री उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.रोहित्री जळल्याने कोथिंबीर, टरबूज, खरबूज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने या बाबत महावितरण विभागातील अधिकाऱ्यांची मी चर्चा केली. या चर्चेतून चालते फिरते रोहित्र ही संकल्पना उदयास आली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याचा माझा प्रयत्न आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच औसा मतदारसंघात माझ्या निधीतून होत आहे. माझ्या या संकल्पनेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार्य केले. शेतकरी हिताचे निर्णय यापूर्वीही घेतले आहेत. आणि पुढेही घेतले जातील. प्रायोगिक तत्त्वावर सध्या आठ रोहित्र उपलब्ध करण्यात आले असून भविष्यात गरजेनुसार याची व्याप्ती वाढवली जाऊ शकते.

…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]