इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते अशोक वरुटे यांना अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक पदाचे पत्र विभागीय प्रशिक्षक दिपक देवरे यांनी प्रदान केले. हे व्यक्तिमत्व विकासाचे एक नवे दालन कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांसाठी खुले होत आहे.
याबाबत दिपक देवरे म्हणाले, राष्ट्रीय युवा धोरणाच्या अंगाने युवा पिढीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न अनुभव कट्टे करताहेत. त्यात संविधानिक जाणीवांचे रोपण, नागरी समस्यांवर मांडणी तथा व्यसनमुक्त निरोगी राहण्यासाठीची जीवनशैली विकसित केली जाते.
संजय रेंदाळकर म्हणाले, तरुणाईने आपले नेतृत्व गुण विकसनासाठी अनुभव कट्टा समजून घ्यावा. मित्र बनावे. विविध शिबिर आणि समाजोपयोगी कार्यासाठी पुढाकार घ्यावा.
इंद्रायणी पाटील यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी शरद वास्कर, विनायक होगाडे,रोहित दळवी,अमित कोवे,दिग्विजय चौगुले,उर्मिला कांबळे,सनोफर नायकवडी, अमोल पाटील ,अंनिस कांबळे, पवन होदलूर, आदित्य धनवडे, दामोदर कोळी, नम्रता कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.