इनरव्हील क्लब उदगीरच्या वतीने नवदुर्गा स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण
◆ अनिता यलमटे व दिपाली औटे नवदुर्गाने सन्मानित.◆
उदगीर (दि.22) नवरात्र हा शक्तीचा उत्सव आहे .देवीप्रमाणेच तेज व शक्ती असणार्या कर्तृत्ववान महिलांना इनरव्हील क्लबच्या वतीने 'नवदुर्गा स्त्रीशक्ती पुरस्कार' प्रदान करण्यात आले.यामध्ये शिक्षण व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त 'अनिता यलमटे' तसेच राजकीय क्षेत्रात लहान वयात यश प्राप्त करून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या उदगीर परिसरातील अनेक सामाजिक कार्याची व महिलांच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविणार्या दिपाली औटे यांना नवदुर्गा स्त्रीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी इनरव्हील क्लब उदगीरच्या पास्ट प्रेसिडेंट झोनल सब कोर्डिनेटर मीरा चंबुले, अध्यक्षा स्वाती गुरुडे ,सचिव मानसी चन्नावार ,कोषाध्यक्ष पल्लवी मुक्कावार, चार्टर आय एस ओ स्नेहा चणगे, सहसचिव प्रिया नारखेडे ,आय एस ओ योजना चौधरी ,सीसी अश्विनी देशमुख तसेच सदस्य शंकूतला पाटील, तुलसी देशमुख, वैभवी पटवारी,प्रिती दुरूगकर,सुजाता कोनाले,पल्लवी पोलावार,गंगा पांडे,सुवर्णा हिंगणे,रोहिणी चवळे,पंकजा औटे,स्वाती बिरादार ,कल्पना नागरगोजे इ ची उपस्थित होती.
याप्रसंगी इनरव्हील क्लब ऊदगीरच्या शाखेत सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक जाण ठेऊन 'मदतीचा हात' देणारे अनेक उपक्रम राबवले असल्याचे सत्कारमूर्ती अनिता यलमटे यांनी नमूद केले.तसेच दुसऱ्या सत्कारमूर्ती दिपाली औटे यांनी इनरव्हील क्लबचे आभार मानले व त्यांच्या सर्व उपक्रमात सहकार्य करण्राचे जाहीर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अश्विनी देशमुख यांनी केले.