अनाथ बालकांचे पालकत्व

0
288

 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्या वाढदिवसानिमित्त

भाजपायुमो व जेएसपीएमने स्वीकारले

5 अनाथ बालकांचे पालकत्व

लातूर दि.22/7/2021-राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षेनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्च्या,लातूर आणि जेएसपीएम शिक्षण संस्था, खुशी फाऊंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने 5 अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारून एक नवीन सामजिक जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांच्या पालन, पोषण व शिक्षणाचा खर्च युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी उचलला असून त्यांच्या या सामाजिक व विधायक उपक्रमामुळे या निरागस मुलांच्या चेहर्‍यावर भविष्यात हसू फुलेल..! त्यांनी राबविलेेला हा उपक्रम तरूण नेतृत्त्वासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

भाजपा युवा नेते तथा भारतीय जनता युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर हे सामाजिक बांधिलकी लक्षात घेेऊन नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर मोफत अन्‍नसेवा, कोरोना रूग्णांसाठी हेल्पलाईन, घरपोच ऑक्सीजन सेवा, रूग्णवाहिकेचे लोकार्पण असे अनेक उपक्रम राबविलेले आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शहरातील एमआयडीसी भागात जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्‍या स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये भारतीय जनता युवा मोर्च्या व जेएसपीएम शिक्षण संस्था व खुशी फाऊंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने 5 अनाथ मुलांचे पालकत्व भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, नगरसेवक विशाल जाधव, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आले. यामध्ये तर पाच अनाथ बालकांच्या अन्‍न वस्त्र, निवारा व आरोग्याच्या जबाबदारी खुशी फाऊंडेशनचा सोनवणे परीवार व पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जेएसपीएम संस्था व भारतीय जनता युवा मोर्च्याच्यावतीने उचलण्यात आलेली आहे.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्च्याचे सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, उपाध्यक्ष गजेंद्र बोकन, अजय कोटलवार, शंतनु जवळेकर, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य गोविंद शिंदे, मु.अ.संजय बिराजदार, धनु आवस्कर, अमर पाटील, यशवंत कदम, आकाश पिटले, पंकज देशपांडे, महादेव पिटले, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, राजेश पवार यांच्यासह जेएसपीएमचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनाथांच्या चेहर्‍यावर हसू फुलविण्याचे काम करू

भारतीय जनता युवा मोर्च्या, जेएसपीएम संस्था व खुशी फाऊंडेशन यांच्या समन्वयातून 5 अनाथ बालकांचे पालकत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. या माध्यमातून आम्ही नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. या 5 विद्यार्थ्यांच्या अन्‍न, वस्त्र, निवारा, आरोग्याची जबाबदारी खुशी फाऊंडेशनने घेतलेली आहे. तर शिक्षणासह लागणार्‍या सर्वच बाबीची जबाबादारी आता आमच्यावर राहणार आहे. ही जबाबदारी आम्ही आमच्या परिवारतील सदस्य म्हणून स्वीकारली असून या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या अनाथ मुलांच्या चेहर्‍यावर शिक्षण व नोकरीच्या माध्यमातून हास्य फुलवू असा विश्‍वास जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष तथा भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला.

———————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here