28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*अजित पाटील यांच्या जनसवांद पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*अजित पाटील यांच्या जनसवांद पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

माझं लातूर संवाद लातूरकरांशी या जनसंवाद ‘ पदयात्रेतून युवा नेते
अजित पाटील कव्हेकरांनी जाणून घेतल्या लातूरकरांच्या समस्या


जनसवांद पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ः हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग


लातूर ;(वृत्तसेवा ):-माझं लातूर संवाद लातूरकरांशी या माध्यमातून संवाद साधण्यासाठी भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसंवाद यात्रा काढली असून या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अजित भैय्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो अजित भैय्या जैसा हो, एकच पर्व अजित पर्व अशा घोषणा देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत केला.


माझं लातूर संवाद लातूरकरांशी या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शहरातील लातूरकरांचे ग्रामदैवत असलेल्या सिध्देश्वर मंदिरात महाअभिषेक करून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर,  जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निळकंठराव पवार, जिल्हा सरचिटणीस मिनाताई भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रवीण सावंत, जेएसपीएम संस्थेच्या संचालिका आदितीताई अजित पाटील कव्हेकर,जिल्हा उपाध्यक्ष लालासाहेब देशमुख, मंडलाध्यक्ष ललीत तोष्णिवाल, प्रमोद गुडे, संजय गिर, गोपाळ वांगे, चंद्रकांत खटके, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.गणेश गोमचाळे, बालाजी शेळके, सुभाषअप्पा सुलगुडले, जाफर पटेल, जमिलभाई मिस्त्री, विनायक मुमाने, ज्योतीराम चिवडे, अजय भूमकर, किशोर घार, नेताजी मस्के, उत्तम सूर्यवंशी, गोपाळ वांगे,  माधवराव गायकवाड, केदार पाटील, तानाजी झुंजे, अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे, रविशंकर लवटे, शोभाताई कोंडेकर, किशोर जैन, शशिकांत हांडे, सागर घोडके,संतोष तिवारी, संतोष ठाकूर, राहुल बुकटे, संतोष जाधव, काका चौगुले, प्रियंका जोगदंड, अरुण जाधव , आकाश बजाज, ऋषिकेश क्षिरसागर, पंकज शिंदे, गजेंद्र बोकण, राहूल शहरकर, राहुल भुतडा, शरद तिवारी, रोहित कांबळे ,संतोष मदने, मनोज काळे, प्रमोद शेंडगे, धीरज कुरील, प्रदीप काळे, संदीप काळे, शंकर शिताळकर, दुर्गेश चव्हाण,योगेश सुळ, किशोर जैन, बाळू शिंदे, शक्तीदादा मदने,अ‍ॅड.अभिजीत मदने, करण हाके, आकाश जाधव, योगेश गंगणे, शाम गुंजोटे, निळकंठ मदने, यशवंत गायकवाड, अभिजीत मुनाळे,आकाश पिटले, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शहरातील- सिद्धेश्वर चौक- गणपती चौक -लाड गल्ली- राम गल्ली – पटेल चौक- माळी गल्ली- तेली गल्ली – गडदे गल्ली- काळे गल्ली-सूळ गल्ली- पापविणाश चौक मार्गे बालाजी मंदिर परिसरापर्यंत माझं लातूर संवाद लातूरकरांशी या माध्यमातून युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला ,त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या . त्यांच्या या अडचणी मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी या संवादादरम्यान व्यक्त केला.


शहरातील सिध्देश्वर मंदिरापासून ढोल-ताषाच्या गजरात काढण्यात आलेल्या माझं लातूर संवाद लातूरकरांशी या जनसंवाद यात्रेस पहिल्याच दिवशी लातूरकरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सिध्देश्वर मंदिर परिसरात रविशंकर लवटे यांच्या  पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सिध्दीविनायक गणेश मंदिरात मधुसिंह ठाकूर व धोंडूसिंग ठाकूर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सुरतशहावली येथील दर्ग्यास भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्याहस्ते चादर चढविण्यात आली. यानंतर 1008 चिंतामनी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात भालचंद्र हूकुमचंद लाड यांनी सत्कार केला. नगरसेवक खय्युमभाई शेख यांच्या निवासस्थानी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीनेही योगेश उन्हाळे यांनी स्वागत केले. याबरोबरच महादेव शिंदे, फरीद शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्यांनीही सन्मान केला.  


श्री करबस स्वामी मठ संस्थान लातूर, श्री संत सावता माळी मंदिर माळी गल्ली, ज्ञानकला प्रि-प्रायमरी स्कूल, सरदार वल्लभाई पटेल चौक, गडदे गल्ली श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर, काळे गल्ली भागातील विर महाराणा प्रताप गणेश मंदिर या संस्थानांच्यावतीने युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांचा सत्कार केला. याबरोबर व्यापारी आनंद अंकलकोटे, विशाल लाड, प्रसाद गडदे, संतोष मदने , सत्यवान बुरबुरे , गोवर्धन गाडेकर , मदनसिंग तिवारी, यशवंत गायकवाड, सय्यद रहेमान व जयप्रकाश गौंड , ओम पाटील , मनोज काळे ,  यांनीही युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांचा सत्कार करून माझं लातूर संवाद लातूरकरांशी या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्या-त्या परिसरातील अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. ङ्ग यावेळी यामाझं लातूर संवाद लातूरकरांशी या जनसंवाद पदयात्रेमध्ये भाजपाचे पदाधिकारी व भाजपा युमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


—————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]