औसा :- औसा तालुक्यातील धानोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व बारा उमेदवार विजयी झाले आहेत .या निवडणुकीत दोन पॅनल मध्ये लढत झाली या निवडणूकी कडे संबध तालुक्याचे लक्ष लागले होते.

या प्रतिष्ठेच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलचे नागोराव कवरे यांची बिनविरोध निवड झाली तसेच मतदान होऊन विक्रम पाटील, मनोज कुलकर्णी, अरविंद कोळपे, शरद सोमवंशी, आकाश कास्ते, ज्ञानोबा कोळपे, राम कोळपे, बाबासाहेब देशमुख, बालाजी माने, सौ आशालता ज्ञानोबा सोमवंशी, सौ केसरबाई विनायक क्षेत्रफाळे आदी उमेदवार बहुमताने विजयी झाले.

या निवडणुकीत सरपंच सुरेश मुसळे, उपसरपंच नागेश कोळपे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजीव सोमवंशी, शालेय समिती अध्यक्ष रमेश सोमवंशी, माजी सरपंच नामदेव हाळे, रणजित कोळपे, बेलपान कास्ते, बब्रुवान पाटील, बिटू पाटील, बालाजी जन्मले, अजित सोमवंशी, गुंडाप्पा कवरे, पापास कोळपे, राजेंद्र कोळपे, जगन्नाथ शिंदे, शेषराव कास्ते, संजय हाळे, पुरुषोत्तम कोळपे, सुदर्शन सोमवंशी आदी लोकानी परिश्रम घेतले .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ. एम. व्ही. कात्रे यांनी काम पाहिले सर्व विजयी उमेदवाराची गावात मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले या विजया बद्दल सर्व ग्रामस्थाचे संतोष भाऊ सोमवंशी यांनी आभार व ऋण व्यक्त केले .