26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeदिन विशेष*विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भाविकांना फराळ वाटप*

*विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भाविकांना फराळ वाटप*

कार्यक्रमास विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

इचलकरंजी ; दि.१०- ( प्रतिनिधी)-–इचलकरंजी येथे थोरात चौकातील विठ्ठल मंदिरात आज रविवारी आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भाविकांना खिचडी, केळी, राजगिऱ्याचे लाडू अशा फराळाचे वाटप करण्यात आले. दरम्यान , दिवसभरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

देवांची भूमी आणि संतांची देवभूमी असलेल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशी सोहळ्याला मोठे महत्त्व आहे.त्यामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . वारकरी संप्रदायातील वारकरी तर राहत्या ठिकाणाहून पंधरा-वीस दिवस अगोदरच विठू माऊलीच्या भेटीसाठी व पंढरपूर दर्शनासाठी पायी बाहेर पडतात. ज्याला आपण वारी म्हणून संबोधतो. विविध संतांच्या पालख्या देखील विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरला प्रस्थान करतात आणि आजच्या आषाढी एकादशीच्या पुण्यदिवशी विठोबाची आणि संतरुपी पालख्यांची भेट होते.

अशा या शुभ दिनी
इचलकरंजी येथे थोरात चौकातील विठ्ठल मंदिरात आज रविवारी आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भाविकांना खिचडी, केळी, राजगिऱ्याचे लाडू अशा फराळाचे वाटप करण्यात आले. याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.
यावेळी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख विकास आडसुळ, पोलीस अधिकारी अभिजीत पाटील , गावभाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री मुळीक , माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे विजय पाटील, गजानन जाधव, शरद बाहेती, मुकेश दायमा, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, रावसाहेब चौगुले, संदीप जाधव, अनिल सातपुते, हरीश पसनुर, मुकुंदराज उरुणकर, अमित कुंभार, सचिन वडर, महेश भिंगवडे, गणेश जाधव, विनायक पोवार, प्रमोद घोटणे, गोरख हत्तीकर यांच्यासह
दुर्गावाहिनी शहर संयोजिका कविता पसनुर ,ॲक्टिव्ह ग्रुपच्या सदस्या सौ.रजनी शिंदे ,सौ. सरिता पांडव, सौ. दीप्ती लोकरे ,सौ.अमिता बिरंजे ,सौ. कविता शिंगारे ,सौ. राखी मुरतुले, सौ. संजीवनी हरिहर ,सौ. प्रियंका गोयलकर ,सौ. कविता पाटील ,सौ. अमिता माने यांच्यासह कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे नियोजन विहिंप छत्रपती संभाजी महाराज प्रखंड यांच्यावतीने करण्यात आले होते .हा धार्मिक उपक्रम शहर सेवा विभागामार्फत राबवण्यात आला.
दरम्यान , दिवसभरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]