19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीयसामान्‍यांच्‍या समस्‍या सोडवण्‍याकरीता संवाद संपर्क कार्यालय पुढाकार घेईल -फडणवीस

सामान्‍यांच्‍या समस्‍या सोडवण्‍याकरीता संवाद संपर्क कार्यालय पुढाकार घेईल -फडणवीस

आ. कराड यांच्‍या संपर्क कार्यालय उद्धाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस 

लातूर दि. ०४– भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी सुरू केलेल्‍या  ‘संवाद’ संपर्क कार्यालय जनसामान्‍याच्‍या समस्‍या, अडीअडचणी सोडवण्‍याकरीता पुढाकार घेईल येथे येणाऱ्या प्रत्‍येकाच्‍या समस्‍येचे निरासन होईल असा विश्‍वास माजी मुख्‍यमंत्री तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला. 

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा विधानपरिषदेचे सदस्‍य आ. रमेशअप्‍पा कराड यांनी नव्‍याने लातूर येथील अंबाजोगाई रोडवर सुरू केलेल्‍या संवाद या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी सकाळी विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्धाटन करण्‍यात आले. याप्रसंगी केंद्रीय रसायण व खते राज्‍यमंत्री ना. भगवंत खुब्‍बा, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्‍यू पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्‍यक्ष विनायकराव पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्‍यक्ष सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, माजी आमदार गोविंदअण्‍णा केंद्रे, कृषी मुल्‍य आयोगाचे माजी अध्‍यक्ष पाशा पटेल, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, लातूर शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश उपाध्‍यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, माजी शहर जिल्‍हाध्‍यक्ष शैलेश लाहोटी, राजेश कराड, जिल्‍हा  सरचिटणीस विक्रम शिंदे, रामचंद्र तिरूके, महिला आघाडीच्‍या रेखाताई तरडे, अमोल पाटील यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना ना. देवेंद्रजी फडणवीस म्‍हणाले की, अत्‍यंत सुसज्‍य असे कार्यालय आ. रमेशअप्‍पा  कराड यांनी सुरू करून त्‍यास संवाद हे नाव दिल्‍या बद्दल त्‍यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संवाद हा सर्वात महत्‍वाचा असतो. सामान्‍य माणूस आणि त्‍यांच्‍या समस्‍या यातील दुवा, सेतू अडचणी सोडविण्‍याचे काम करत असतो. अशा सर्व सामन्‍यांच्‍या हक्‍काची जागा कार्यालयाच्‍या  माध्‍यमातून उपलब्‍ध झाली असून या कार्यालयात येणाऱ्या प्रत्‍येक माणसांच्‍या अडीअडचणी सोडविण्‍याचा प्रयत्‍न व्‍हावा, येणाऱ्या प्रत्‍येकाला दिलासा मिळावा खऱ्या अर्थाने आ. कराड यांच्‍या मार्गदर्शनाखाली हे संवाद कार्यालय जनसामान्‍यांच्‍या समस्‍या सोडविण्‍याचे केंद्र ठरेल असेही त्‍यांनी बोलून दाखविले. 

प्रारंभी आपले मनोगत व्‍यक्‍त करताना आ. रमेशअप्‍पा कराड यांनी देशात गेल्‍या आठ वर्षापासून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र शासनाच्‍या माध्‍यमातून सुरू केलेल्‍या विविध योजना आणि विकास कामे जिल्‍हाभरातील गावागावात, खेडोपाडयात वाडीवस्‍ती पर्यंत, आठरापगड जातीधर्मापर्यंत पोंहचविण्‍याचे काम या कार्यालयाच्‍या माध्‍यमातून केले जाणार असून प्रत्‍येक घटकाला न्‍याय देण्‍याचे कामही आपल्‍या  मार्गदर्शनाखाली करणार आहोत अशी माहीती देवून येणाऱ्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणुकीत लातूर जिल्‍हा हा एक नंबरचा जिल्‍हा करण्‍याचे काम भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने आम्‍ही करणार आहोत असे अभिवचन दिले. 

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या शुभहस्‍ते भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ संस्‍थेच्‍या  निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्‍याबद्दल नवनिर्वाचित संचालक नितीन शेटे, राम कुलकर्णी, प्रविण सरदेशमुख त्‍याचबरोबर भाजपाचे प्रदेश प्रवक्‍ते विनोद वाघ यांचा सत्‍कार करण्‍यात आला तर भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस अशोक काका केद्रें यांना त्‍याच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त सत्‍कार करून शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या. 

याप्रसंगी रमाकांतबापू मुंडे, धर्मपाल देवशेटे, राहूल केंद्रे, विजय क्षिरसागर, बस्‍वराज पाटील, अमोल निडवदे, वसंतराव डिघोळे, भागवत सोट, गोविंद नरहरे, जगदिश कुलकर्णी, अनिल भिसे, डॉ. बाबासाहेब घुले, तुकाराम गोरे, हणमंत नागटिळक, सतिश अंबेकर, बन्‍सी भिसे, ऋषिकेश कराड, दशरथ सरवदे, बस्‍वराज रोडगे, मनोज पुदाले, विजय काळे, महेंद्र गोडभरले, शरद दरेकर, विजय गिल्‍डा, बालाजी गुटे, हणमंत देवकते, दिलीप मजगे, महेंद्र जाधवर, सुधाकर कराड, रघुनाथ केंद्रे, बी. पी. सुर्यवंशी, वसंत करमुडे, शामल कारामुंगे, मिनाक्षी पाटील, आरती राठोड, उषा रोडगे, सुरेखा पुरी, पंडीत सुकणीकर, सुरेंद्र गोडभरले, सुकेश भंडारे, अनंत कणसे, वैभव सापसोड, गोपाळ पाटील, श्रीकृष्‍ण पवार, धनंजय बिक्‍कड, श्रीकृष्‍ण जाधव, प्रताप पाटील, धनराज शिंदे, काशिनाथ ढगे, विनायक मगर, पांडूरंग गडदे, विवेक बाजपेयी, अनंत कोरे, शिवसिंह सिसोदिया, भैरवनाथ पिसाळ, सुनिल होनराव, राजकीरण साठे, दत्‍ता सरवदे, शामसुंदर वाघमारे, संतोष चव्‍हाण, राजू आलापूरे, आदिनाथ मुळे, सुरेश राठोड, ज्‍योतीराम चिवडे, सुनिल पाटील, शंकर रोडगे, दत्‍ता  गोरे, संजय डोंगरे, शंकर चव्‍हाण, धनंजय म्‍हेत्रे, गुणवंत करंडे, महादेव मुळे, जया काबरा, लता भोसले, उषा शिंदे, अनुसया फड, श्रध्‍दा जगताप, सुनिता माडजे यांच्‍यासह भाजपाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]