19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeठळक बातम्यालातूर हे देशामध्ये शिक्षणाची पंढरी आहे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर हे देशामध्ये शिक्षणाची पंढरी आहे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

   
लातूर दि.04-06-2022
लातूर शहरातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक व शिक्षणसंस्थाचे अथक प्रयत्न, सातत्य व दूरदृष्टीमुळे लातूरने संपूर्ण देशामध्ये मेडीकल कॉलेज व इतर प्रवेशामध्ये आपला वेगळा ब्रँड निर्माण केला आहे. त्यामुळे लातूर हे शिक्षणाची पंढरी बनली आहे. असे प्रतिपादन जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते माताजी नगर,लातूर येथील वसंत विहार प्रि-प्रायमरी स्कूलच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतबापू गिर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, माजी महापौर सूरेश पवार, सुभाषअप्पा सुलगुडले, जफर पटेल, नगरसेविका सौ. भाग्यश्री शेळके, बालाजी शेळके, कमलाकर डोके, बालाजी गाडेकर, रवी जोशी, डॉ.शेंदकर, महात्मा बसवेश्‍वर मंडल भाजपाचे संजय गीर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले, शिक्षणाच्या प्राथमिक वर्गापासून सुसंस्कृत आत्मविश्‍वासी, सदाचारी, राष्ट्रप्रेमी युवक निर्माण व्हावा म्हणून त्याला भारतीय अध्यात्म, मूल्य, विचार व शिक्षणाच्या माध्यमातून दिले पाहिजे. पंरतु निधर्मीपणाच्या नावाखाली आपण भारतीय मुल्यांना बाजूला ठेवलेले आहे. त्यामुळे आज तरूणांवर वेगळे संस्कार होत आहेत. त्यातून अविचारी तरूण बनून परिवार व समाजाला नष्ट करण्याचे काम करीत आहे.  


केंद्र सरकारने सीबीसीएस नवीन शिक्षणपध्दती 35 वर्षानंतर आणलेली आहे. त्यातून देशाच्या व जगाच्या गरजा पुरवणारे तरूण होतील व यामुळे भारत महाशक्‍ती बनेल. असे प्रभावी विचार माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मांडले. यावेळी माजी महापौर सूरेश पवार व भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी संजय गीर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका आश्‍विनी गिर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रविंद्र जगदाळे व अ‍ॅड.पूनम पांचाळ यांनी केले तर आभार आशा भारती यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला वंदना गिर, सूरेश गिर, संस्थेचे संचालक सचिन गिर, सरस्वती गिर, काशिनाथ पूरी, मोतीबाबा गोसावी, संस्थेच्या संचालिका शितल जगदाळे, मनिषा गोसावी यांच्यासह माताजी नगर, पटेल नगर, मोती नगर परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————–

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून स्वागत


राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लातूर दौर्‍यावर आले असताना भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर रेल्वेस्थानकावर त्यांची भेट घेवून त्यांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत माजी कामगा कल्याण मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.सुधाकर श्रृंगारे, भाजपाचे प्रदेश महासचिव अरविंद पाटील निलंगेकर, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड, आ.अभिमन्यू पवार,माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आ.सुधाकर भालेराव, भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, परिक्षीत पवार, सुभाषअप्पा सुलगुडले, बाबू खंदाडे, रोहित पाटील गौरकर, विक्रम शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]