महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना मुख्यालय लातूर आयोजीत आंदोलनाच्या अनुषंगाने झालेल्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बैठकीत मागण्या मान्य केल्याने लातूरात जल्लोष
लातूर…महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही राज्यातील परिचारीकांची एकमेव शासनमान्य संघटना असून संघटनेचे मुख्यालय लातूर येथे आहे.
दि २३ मे पासून १ जुन २०२२ या काळात संघटनेनी परिचारीका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे ३ दिवस भव्य निदर्शने केली या निदर्शनास राज्यभरातून १५०० परिचारिका सहभागी झालेल्या होत्या,तसेच राज्यभर ही निदर्शने व आंदोलन झाले व वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री मा.अमितभैय्या देशमुख साहेब यांनी या आंदोलनाच्या अनुषंगाने मंत्रालयातील दालनात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक घेऊन मागण्याबाबत चर्चा तर केलीच परंतु त्याच्या पूर्ततेबाबत ठोस उपाय योजना आखल्या. जसे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाचे मा. अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख साहेब यांची परिचारिकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली तर,मंत्री महोदयांचे कक्ष अधिकारी श्री श्रीकांत सोनवणे साहेब यांची या सर्व विषयात पाठपुरावा करण्यासाठी नेमणूक करून परिचारिका संवर्गाच्या केवळ मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्या ४५ दिवसात पूर्ण करण्यासाठी ऐतिहासिक उपाययोजना ही आखल्या.
त्यासोबतच दि०२/०६/२०२२ रोजी लातूर चे लाडके शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांच्या पुढाकारातून मा. राजेश भैय्या टोपेसाहेब,सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांची एकत्रित बैठक घेऊन सर्व मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली व शासन परिचारिकांच्या मागण्याबबाबत सकारात्मक असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्याना सूचना केल्या.
दोन्ही विभागाच्या मंत्री महोदयांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी उचित सूचना प्रशासकीय अधिकाऱ्याना देऊन १५ जुलै पर्यन्त सर्व मागण्यांची पूर्तता केली जाईल असे सांगितले व हे परिचारिका संवर्गाच्या ईतिहासात प्रथमत:च असे निर्णय झाल्याने परिचारिकांनी आपला आनंद अगदी जल्लोषात साजरा केला आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केक कापून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला,संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ.मनीषा शिंदे,राज्यउपाध्यक्ष भीमराव चक्रे, राज्य कार्याध्यक्ष श्री अरुण कदम,राज्यसरचिटणीस सुमित्रा तोटे राज्यकार्यकरिणी सदस्य पांडुरंग गव्हाणे,श्री सुनील कुंटे,विवेक वागलगावे हे या आंदोलन काळात सलग १० दिवस मुंबईमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याने आज त्यांच्या उपस्थितीत आज हा अभिनंदन सोहळा पार पडला.याकाळातील अनुभव सांगत मा.अमितभैय्या देशमुख साहेब,वैद्यकीय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री लातूर यांचे विशेष आभार व्यक्त केले.
त्याचबरोबर मा.विक्रम काळेसाहेब. शिक्षक आमदार औरंगाबाद विभाग,यांचे ही आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लातूर शाखेच्या अध्यक्ष छाया चव्हाण, उपाध्यक्ष संजीव लहाने, जिल्हा सचिव भागवत देवकते, खजिनदार भागयश्री जोगदंड, जिल्हा संघटक उणिता देशमाने, सदस्य दीपक शिंदे, संभाजी केंद्रे, महेश कांबळे, सुकुमार गुडे ,श्री योगेश वाघ, आराधना क्षीरसागर, गरड माया, निकम किरण, जाधव शोभा यांनी प्रयत्न केले.