लातूर दि.३०– भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमित्ताने रेणापूर येथील आदिशक्ती श्री. रेणूकादेवीच्या मंदिरात भाजपा लातूर ग्रमीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे यांच्या वतीने पेढे तुला करण्यात आला. सत्ता असो अथवा नसो निस्वार्थ भावनेने असंख्य कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात हीच माझी मोठी ताकद आहे असे उदगार यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांनी काढले. याप्रसंगी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, शेतकरी शेतमजूराच्या कल्याणासाठी सातत्याने संघर्ष करणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचा ३० मे २०२२ रोजी जन्मदिवस. या निमित्ताने असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणापूर येथील आदिशक्ती श्री. रेणूकादेवी मंदिरात आ. कराड यांच्या शुभहस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर भाजपा लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे यांच्या वतीने पेढे तुला करण्यात आला. याप्रसंगी रेणापूर येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी रेणापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने माजी सभापती अनिल भिसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, उपसभापती अनंत चव्हाण यांनी आ. रमेशअप्पा कराड यांचा फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला व जन्मदिनानिमीत्त दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्याच्या बळावरच अन्याय अत्याचाराविरूध्द संघर्ष केला आणि यापुढेही करत राहणार असून गेल्या विधानसभा निवडणूकीत युतीच्या तडजोडीत मला उमेदवारी मिळाली नसल्याने तीस हजाराहून अधिक नोटाला मिळालेली मते लक्षवेधी ठरली. याची दखल घेवून पक्षाने मला विधानपरिषदेवर काम करण्याची संधी दिली. हे केवळ कार्यकर्त्याच्या ताकदीमुळेच घडू शकले. आजपर्यंत कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रेमाला आणि विश्वासाला कदापी तडा जावू देणार नाही असा विश्वास यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड यांनी व्यक्त केला. प्रारंभी तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सुत्र संचलन जिल्हा प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी शहराध्यक्ष दत्ता सरवदे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, भाजपा नेते राजेश कराड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहरे, भागवत सोट, सतिष अंबेकर, वसंत करमुडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, ओबीसी मोर्चाचे डॉ. बाबासाहेब घुले, महेंद्र गोडभरले, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, धनराज शिंदे, श्रीकिशन जाधव, सुकेश भंडारे, श्रीकृष्ण पवार, अनुसया फड, शीला आचार्य, महेश गाडे, श्रीकृष्ण मोटेगावकर, उज्वल कांबळे, रमा फुलारी, शेख आजिम, राज जाधव, सिध्देश्वर मामडगे, संतोष चव्हाण, राजू आलापूरे, शिवमुर्ती उरगुंडे, श्रीकांत सुर्यवंशी, अजित गायकवाड, श्रीमंत नागरगोजे, अनिल येलगटे, सुरेश बुड्डे, शालिक गोडभरले, पांडूरंग राऊतराव, राजू आत्तार, संजय डोंगरे, रमेश चव्हाण, अशोक सावंत, उत्तम घोडके, विलास दंडे, नाथराव गिते, धनंजय म्हेत्रे, अंतराम चव्हाण, लखन आवळे, अच्युत कातळे, गणपत पवार, गोविंद राजे, नंदकुमार वलमपल्ले, भिमराव मुंडे, वसंत फुलसे, प्रल्हाद फुलारी यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.