~ सर्व देशांतर्गत फ्लाइट्स व हॉटेल्सवर ५० टक्के सूट ~
मुंबई, २४ मे २०२२: क्लीअरट्रिप या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑनलाइन ट्रॅव्हल व्यासपीठाने ओटीए विभागामध्ये इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम ‘क्लीअरट्रिप तत्काल’ सादर केला आहे. २५ मे २०२२ पासून दररोज दुपारी १२ वाजल्यापासून क्लीअरट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्हल हे प्लॅटफॉर्म्स फक्त मर्यादित बुकिंग्जसाठी सर्व देशांतर्गत फ्लाइट्स व हॉटेल्सवर ५० टक्क्यांची सूट देतील.
या उपक्रमाची सुरूवात करण्याकरिता क्लीअरट्रिपने २ विलक्षण जाहिरातींच्या माध्यमातून त्यांची नवीन मोहिम ‘अब इससे अच्छी क्या गूड न्यूज’ लाँच केली आहे. या जाहिराती आता सर्व डिजिटल व्यासपीठांवर सुरू आहेत आणि आऊटडोअर व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून विस्तारित करण्यात येतील.
पर्यटकांना ट्रॅव्हल बुकिंग्जवर अभूतपूर्व सूटबाबत माहिती देण्याव्यतिरिक्त ही मोहिम समर ट्रॅव्हल सीझनच्या शुभारंभासह पर्यटन क्षेत्रातील अगदी योग्य वेळी ग्राहकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. या समर ट्रॅव्हल सीझनदरम्यान पर्यटकांच्या मागणीमध्ये वाढ दिसण्यात आली आहे.
यंदा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त क्लीअरट्रिपचा प्रवासाला आनंदमय अनुभव बनवणारे व्यवसाय व उपक्रम असलेल्या महिलांना प्रशंसित करण्यासाठी व्यासपीठ देण्याचा कंपनीचा मनुसबा आहे.
क्लीअरट्रिपचे सीएमओ कुणाल दुबे म्हणाले, “आम्हाला प्रवासासाठी अनपेक्षित मागणी दिसण्यात येत आहे आणि काळासह त्यामध्ये वाढ होत राहिल. पर्यटक त्यांच्या पुढील सुट्टीची धमाल करण्यास सज्ज असताना आम्हाला क्लीअरट्रिप तत्काल लाँच करण्याचा आनंद होत आहे, जे ओटीए क्षेत्रामध्ये अभूतपूर्व ऑफरिंग्ज देते. क्लीअरट्रिप तत्कालच्या माध्यमातून आमची प्रवास करण्याची इच्छा असणा-या सर्व ग्राहकांना उपलब्धता देण्याची इच्छा आहे, ज्यामुळे ते दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या ट्रिपप्रती पुढाकार घेऊन त्याचे नियोजन करू शकतील. आम्ही आता प्रत्येक चांगल्या बातमीला अधिक सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आमचे ग्राहक आता अधिक खर्च होण्याबाबत चिंता न करता लांबची, आरामदायी ट्रिप बुक करू शकतात. तुम्हाला फक्त या संधीचा लाभ घ्यायचा आहे. आम्ही सर्व देशांतर्गत फ्लाइट्स व हॉटेल्सवर ५० टक्के सूट देणारे एकमेव ओटीए आहोत. ‘उत्साहपूर्ण प्रवास, आनंदमय आठवणी’ म्हणण्याची ही क्लीअरट्रिपची पद्धत आहे.”