लातूर;
लातूर शहर महानगरपालिकेने आदरणीय दादांच्या नावे पु. आहिल्यादेवी होळकर चौक ते गरुड चौक या राष्ट्रीय महामार्गाला केलेले नामकरण तसेच हा केलेला बहुमान म्हणजेच दादांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात केलेल्या तपश्येचे फलीतच होय …लातूरच्या, सामाजीक , राजकीय, सांस्कृतीक , धार्मीक प्रत्येक क्षेत्रात एक अतुलनीय कामगीरी करुण आपला एक आगळा वेगळा ठसा उमटवणारे दादा संपुर्ण लातूरकरांना या ऐतीहासीक निर्णयामुळे कायम स्मरणात राहतील यात खरोखर तसुभर ही शंका नाही …प्रत्येक व्यक्ती सामाजीक ऋण घेऊन जन्मास येते त्याची परतफेड करणे हे त्याचे आद्यकर्तव्यच असते , हे कर्तव्य बजावत असताना समाजावर निस्वार्थ प्रेम करणे , समाजाप्रती सर्मपीत होऊन शरीराचा कन कन खर्च करणे हे कर्मयोग्याचे प्रमुख लक्षण होय हेच कर्मयोगी सामाजीक कर्तव्याप्रती निरंतन प्रेरणा देत राहतात आणी याचे भान देखील नविन पिढी आनंदाने जपते प्रेरीत होउन अधिकाधीक सर्मपीत होते .
लातुर शहरातील गावभागात जन्माला आलेल्या दादांनी लातूरच्या श्री केशवराव सोनवने यांच्या नेतृत्वात तयार झालेले, पहील्या नगरपरीषदेचे नगरसेवक म्हणुन व पहिले बांधकाम सभापती म्हणून सुरवात केली व तसेच राजकीय सर्मपणाच्या भावणेने प्रेरीत झालेले दादा त्याकाळच्या राजकारण्यांनी अगदी जवळुन अनुभवले ..लातूर शहर म्हणजे त्याकाळची व आजची सुध्दा तसेच मराठवाड्याची सांस्कृतीक राजधानीच होय त्याकाळी गुरुवार संगीत क्लबचे फायंडर मेंबर म्हणून दादांनी अनेक सांगीतीक कार्यक्रमाचे आयोजन करुण तथा प्रत्येक सांस्कृतीक उपक्रमात हीरेरीने सहभागी होऊन आपल्या लातुरच्या सांस्कृतीक भुमीत एक मानाचा तुरा रोवला ….
तत्कालीन बुर्जुग मंडाळी आजतागायत ती आठवण कायम स्वरुपी काढतात . ..तत्कालीन लोक पंढरपुरची वारी मनोभावे करत असत व त्याकाळात पंढरपुरची वारी करुन परत येणारया वारकर्यांसाठी प्रसादाची सोय करणे व लातूरच्या वारकरी सांप्रदायाची अखंड हरीणामाची पताका लातुरातील पहिल्या सप्ताहाच्या माध्यमातून सुरु करून उच्च विद्या विभुषीत महाराज मंडळी आनुन अन्नदानासोबतच ज्ञानदान व प्रभुभक्तीची महीमा आद्यग्रामदैवत प्रभु रामलिंगेश्वराच्या दारी सेवा करण्याचे सदभाग्य दादांना लाभले ..
श्रीरामलिंगेश्वराचे विश्वस्थ मंडळाच्या स्थापनेपासून देह सोडेपर्यंत अध्यक्ष म्हणून व अखंड चाळीस वर्ष अखंड हरिणाम सप्ताह घेऊन दादांनी लातूरात वारकरी सांप्रदायाची पताका कायम फडकत ठेवली. तसेच ग्रामदैवत सिध्देश्वराच्या मंदीराचे विश्वस्थ स्थापणेपासून शेवटपर्यंत खजीनदार म्हणुन काम पाहीले व यात्रेच्या माध्यमातून व धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दादांनी कायम ग्रामदैवत सिध्देश्वराचा महीमा लातुरच नव्हे तर पंचक्रुशीतील व्यापारी तथा भक्तगणापर्यंत पोहचवण्याचे काम केले. गावभागात हिंदु मुस्लीम हे नाते कायम आजतागायत सलोख्याचे आहे ,त्याचे माध्यम म्हणजे सुरतशहावली दर्गा , याच दर्गांच्या उरुस कमीटीचे दादा कायम प्रमुख राहीले आणि म्हणुनच तत्कालीन लोक गावभागात जानकर गुरुजी व लिंबाजीराव दादा यांचा शब्द म्हणजे प्रमान मानत ..याच निस्वार्थ भावनेमुळे तत्कालीन नेतृत्व केशवरावजी सोनवने , शिवराजजी पाटील चाकुरकर, विलासरावजी देशमुख साहेब हे आदरणीय दादांना या सर्व समाजउपयोगी कर्तव्याप्रती निरंतन प्रेरणा देत असत ..आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच उद्दात भावनेनी दादांनी याच प्रमुख चौकांत स्वःताची जागा पु. आहिल्यादेवी च्या पुतळ्यासाठी दिली व त्याच पुतळ्याशेजारी विठ्ठल-रुकमीनी मंदिराची स्थापना केली आज लाखो भावीक व समाजबांधव त्या पु. आहिल्यादेवीच्या शिल्पाचे व पांडुरंगाचे दर्शन घेऊन क्रतक्त्य होतात…अश्या आदरणीय लिंबाजीराव नामदेवराव धायगुडे ( दादांच्या ) सामाजीक , राजकिय , धार्मिक तथा सांस्कृतिक , कार्याच्या स्म्रती निरंतर राहावी, या कार्याची प्रेरणा नविन पिढीस सदोदीत लाभावी या उदात्त हेतुने लातूर शहर महानगरपालीकेने तथा सन्माननीय सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब ,लाडके पालकमंत्री अमितभैय्या देशमुखसाहेब, मा.आ. धीरजभैय्या देशमुख साहेब ,महापौर विक्रांतजी गोजमगुंडे साहेब,विरोधी पक्षनेते दिपकजी सुळ साहेब यांनी शहरातील पुं अहिल्यादेवी होळकर चौक ते नांदेड नाका रिंगरोड या रस्त्याचे नामकरण ” कर्मयोगी ,दानशुर,स्वः लिंबाजीराव धायगुडे मार्ग ” असे करुन आपली आदरांजली अर्पन केली. या अमुल्य स्वीकृती अर्थात जानीवेप्रती लातूरतील सर्व प्रमुख नेतेमंडळी ,पालकमंत्री साहेब व शहर महानगरपालिकेचे तथा महापौर ,विरोधी पक्षनेते आजी माजी सदस्य अधिकारी गण तथा सर्व मान्यवरांचे “धायगुडे परिवार” शतशः ऋणी आहे . या मार्ग नामकरण सोहळ्याला उपस्थित राहून दादांविषयी सर्व वक्त्यांनी दादांच्या कार्यांचा गौरव करून त्या स्म्रतींना उजाळा दिला व त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत पुष्पांजली अर्पण केली.
कार्यक्रम प्रसंगी लातुर नगरीचे लोकप्रीय महापौर विक्रांतजी गोजमगुंडे , महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड अण्णारावजी पाटील, विरोधी पक्षनेते दीपकजी सूळ, माजी उपमहापौर देविदासजी काळे प्रसिद्ध उद्योजक तुकारामजी पाटील, तालमनी रामभाऊ बोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना राजे, सत्यनारायनजी पाटील , गोविंदरावजी डुरेपाटील, तसेच “धायगुडे” परीवारातील सर्व सदस्य व स्थानिक प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.