22.8 C
Pune
Wednesday, January 15, 2025
Homeठळक बातम्यागंगापुर सोसायटीवर खंदाडे पॅनल विजयी, 35 वर्षाची सत्ता अबाधित, काँग्रेसचा पुन्हा पराभव

गंगापुर सोसायटीवर खंदाडे पॅनल विजयी, 35 वर्षाची सत्ता अबाधित, काँग्रेसचा पुन्हा पराभव

लातूर

गंगापुर गावामधील विविध विशाल कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक काल पार पडली, या निवडणूकीत भाजपचे बाबु हणमंतराव खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल उभा होते, काँग्रेस कडुन माजी जिल्हापरिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी, माजी जिल्हापरिषद सदस्य डाॅ सतीश कानडे, माजी पंचायत समिती सभापती व पंचायत समिती सदस्य तानाजी फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली गंगादेवी ग्रामविकास पॅनल उभा होते, या चुरशीच्या निवडणूकीत बाबु हणमंतराव खंदाडे यांचे शेतकरी विकास पॅनल विजयी झाले, लातुर जिल्हा बँक निवडणुक प्रकरण लक्षात घेऊन काँग्रेसच्या दिग्गज लोकांनी प्रयत्न केले, स्वत सहकार महर्षी व पालकमंत्री यांच्याकडुन निवडणूकीत लक्ष घातले गेले तरी सुध्दा भाजपचे नेते बाबु हणमंतराव खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल बहुमताने विजयी झाले, विशेष म्हणजे भाजपचे माजी शहर अध्यक्ष शैलेश लाहोटी यांचे समर्थक असलेले भाजपचे मंडल अध्यक्ष ही काँग्रेस च्या पॅनल च्या मदतीला होते. या निवडणुकीत बाबु हणमंतराव खंदाडे, नारायण व्यंकटराव शिंदे, सतीश श्रीहरी धोत्रे, सुग्रीव भागुराम वाघे, जर्नाधन काशिनाथ फुटाणे, मधुकर लक्ष्मण सुर्यवंशी, शेषेराव अनंतराव दंडीमे, माजीद महम्मद शेख, दगडु इब्राहिम शेख, राम हरीबा बनसोडे, सौ शितलताई अमरदिप शिंदे, सौ राजश्री प्रतापराव शिंदे, सौ नागरबाई शेषराव राऊत आदि 13 जण 150 पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडुण आले. पुर्ण पॅनल ला बहुमत मिळाले, मागील 35 वर्षांपासून गंगापुर संस्था ही भारतीय जनता पक्षाचे हणमंतराव खंदाडे यांच्या ताब्यात आहे.

लातुर जिल्हा सहकारी बॅंक निवडणूकीत बाबु हणमंतराव खंदाडे यांनी लक्ष घातल्यामुळे त्या निवडणूकीचे महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेस च्या दिग्गजांकडून लक्ष घालण्यात आले तरी सुध्दा गंगापुर गावामधील लोकांनी बाबु हणमंतराव खंदाडे यांच्यावर पुर्ण विश्वास दाखवला, काल दि 28/04/2022 रोजी आठ ते चार या वेळेत मतदान प्रकीया पार पडली. कालच सायकांळी मतमोजणी पार पडली. निवडणुक मतमोजणीनंतर गावातुन विजयी मिरवणुक काढण्यात आली. या निवडणुकीत परत एकदा खंदाडे गटाने वर्चस्व राखले. सर्व विजयी उमेदवाराचे स्वागत आबासाहेब शिंदे, उपसरपंच रफीक शेख, माजी व्हाईस चेअरमन बाबुलाल शेख, शिवाजी दंडीमे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मिंड, ईश्वर शेलार, प्रभाकर वाघमारे, अनिल पुजारी, ज्ञानोबा तळेकर, प्रभाकर तळेकर, सुर्यभान मस्के, किसन तळेकर, सिकंदर शेख, चाॅद शेख, गोविंद कुकडे, प्रभाकर भाग्यवंत, बाळु चलवाड, भगवान वाघमारे, योगेश फुटाणे, राहुल बनसोडे, सतिष मस्के, गोपाल कुकडे, सिद्राम राऊत, विनोद दंडीमे, निंगराम दंडीमे, नारायण दहीवाले, विकास शिंदे, मंगेश खंदाडे, प्रताप शिंदे, रामेश्वर शिंदे, सोपान दंडीमे, जगन्नाथ पुजारी गोविंद पुजारी, काशिनाथ राऊत,  गजानन तळेकर, विष्णुदेव चामे, भय्या मिंड, महादेव गायकवाड, माणिक बनसोडे आदि जणांन स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]