लातूर (प्रतिनिधी) : -(बुधवार 27, एप्रिल 2022)
विलासराव देशमुख फाऊंडेशन कडून करण्यात आलेला मियावाकी (घनदाट वृक्ष लागवड) प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे शाळा आणि गावचा परिसर वृक्ष वनराईन सुशोभित झाला असून या प्रकल्पामुळे परिसर सौंदर्याबरोबरच पर्यावरण संवर्धनास मदतच झाली आहे असे ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी मियावाकी प्रकल्प पाहणी वेळी सांगितले आहे.
ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून विकसीत करण्यात आलेल्या या प्रकल्पाची कासारगाव, हरंगूळ खु , हनमंतवाडी येथे जाऊन् त्यांनी पाहणी केली. यावेळी ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड व्हा. चेअरमन विजय देशमुख, संगीता मोळवणे, धनंजय राऊत, अविनाश देशमुख, गजानन बोयणे उपस्थिती होते.
विलासराव देशमुख फाऊंडेशन लातूर जिल्हयात विविध क्षेत्रात कार्यरत आहे. विशेषत: शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात फाऊंडेशनकडून नेहमीच विधायक उपक्रम राबविले जातात. ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून बाभळगाव, हरंगुळ खुर्द, कासारगाव, शिरसी, हणमंतवाडी येथील मियावाकी (घनदाट वृक्षलागवड) प्रकल्पाला करण्यासाठी गावे दत्तक घेण्यात आली आहे. विलासराव देशमुख फाऊंडेशन कडून या गावात मियावाकी (घनदाट वृक्षलागवड) प्रकल्प विकासीत करण्यात आले आहेत.
या पर्यावरण पूरक प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा यांचा सहभाग घेऊन ही योजना विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आली. कासारगाव, हरंगूळ खु, हनमंतवाडी येथे मियावाकी (घनदाट वृक्षलागवड) प्रकल्प अंतर्गत गाव दत्तक घेऊन गावाची निवड करण्यात आली.
————————————————————–