38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeकृषीमहाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती संघ पुणेच्‍या उपसभापतीपदी संतोष सोमवंशी

महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती संघ पुणेच्‍या उपसभापतीपदी संतोष सोमवंशी

मुंबई

महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघ म.पुणे च्‍या पंच वार्षीक निवडणूक होऊन यामध्‍ये सभापतीपदी अहमदनगरचे प्रविण कुमार नाहाटा तर उपसभापती पदी शिवसेनेचे माजी जिल्‍हाप्रमुख तथा औसा बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष ज्ञानोबा सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघ म.पुणे या संस्‍थेची स्‍थापना महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री कै.वसंतरावदादा पाटील साहेब यांच्‍या शुभहस्‍ते दि.२३ जून १९६९ रोजी पुणे येथे करण्‍यात आली होती.
महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघ म.पुणे ही संस्‍था बाजार समित्‍यांची राज्‍यस्‍तरीय शिखर संस्‍था असुन राज्‍यातील ३०६ बाजार समित्‍यांपैकी ३०१ बाजार समित्‍यां या संस्‍थेच्‍या सभासद आहेत या राज्‍यस्‍तरीय संस्‍थेमार्फेत राज्‍यातील बाजार समित्‍यांची संघटना करणे , बाजार समित्‍यांचे कामकाज सुधारण्‍याचे दुष्‍टीने प्रयत्‍न करणे त्‍यामध्‍ये एकसुत्रीपणा आणणे त्‍यांच्‍या अडीअडचणी तसेच कायदेशीर सल्‍ला देणे व मार्गदर्शन करणे तसेच महाराष्‍ट्र शासन , पणन मंडळ व बाजार समिती यामध्‍ये दुवा म्‍हणुन या राज्‍यस्‍तरीय संस्‍थेचे कार्य आहे.
या संघाचे संचालक मंडळा चे निवडणूक होऊन आज दिनांक १२/०४/२०२२ रोंजी सभापती व उपसभापती यांची निवड होऊन यामध्‍ये २००५ पासुन धानोरा गावच्‍या संरपच पदापासुन आपल्‍या राजकरणाचे सुरुवात करणारे तसेच २०११ ते २०१८ या कालावधीत औसा बाजार समितीचे उपसभापती पद भुषविणारे व २०१५ ते २०२१ या कालावधीत शिवसेनेचे जिल्‍हाअध्‍यक्ष पद भुषविणारे धानोरा ते मुंबई असा प्रवास करणारे औसा तालुक्‍यातील एकमेव नेतृत्‍व यांना महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघ म.पुणे उपसभापती पदी निवड करुन मोठी संधी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यंत्री मा.उध्‍वजी बाळासाहेब ठाकरे साहेब, उपमुख्‍यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब, महसुलमंत्री मा.बाळासाहेब थोरात साहेब, नगरविकास मंत्री मा.एकनाथरावजी शिंदे साहेब, यांनी दिली. तसेच या निवडीबदल अभिनंदन केले. व सर्व लातूर जिल्‍हयात निवडीबदल आनंद व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]