दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ हेल्दी फूड फिएस्टा स्पर्धे ‘ चे आयोजन
लातूर दि. ९.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘ हेल्दी फूड फिएस्टा या स्पर्धे ‘ चे आयोजन करण्यात आले होते.ही स्पर्धा जैवतंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी विविध सकस आहारातील पदार्थ बनवून सर्व्ह ॲड अर्न याबाबतीत जागरूक होत कौशल्य विकास व काळाची गरज लक्षात घेता स्वतः बनविलेल्या पदार्थातील विविध घटक व त्यांचे शरीरावर होणारे उपयोग याबाबत सविस्तर असे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाची खास रुची निर्माण व्हावी तसेच त्यांना पौष्टिक अन्नपदार्थ व अन्नप्रक्रियाचे ज्ञान मिळावे यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी समन्वयक डॉ.कोमल गोमारे, सह समन्वयक प्रा.पूजा नागिमे तसेच परीक्षक म्हणून प्रा.मेघा पंडित,डॉ.महेश बेंबडे आणि डॉ.रोहिणी शिंदे यांनी काम पाहिले
.स्पर्धेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियानी , दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, श्रीगोंदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष सूर्यवंशी,सचिव प्रा.काकडे,प्रा.दळवी,डॉ.कर्पे,डॉ.लोहगावकर, दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,डॉ.मिलिंद माने,प्रा.बळवंत सूर्यवंशी, डॉ.राहुल मोरे, श्री.पसारकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी सब्जा सरबत,लिंबू शिकंजी, मेक्सिकन ब्रुसेल्स स्प्राऊट सलाड,व्हेजिटेबल सॅन्डविच,एनर्जी ड्रिंक अँड फ्लेक्स सीड,उडदाचे लाडू,स्नो मॅन त्रफल,लींसीड लड्डू,चिकपी चाट इत्यादी विविध पौष्टिक पदार्थ बनविले होते.संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी असे म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये कौशल्य गुणांचा विकास होण्यासाठी अशा स्पर्धेची अत्यंत आवश्यकता असून आहाराचा समतोल साधने हे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.तसेच सचिव रमेश बियाणी यांनी दैनिक आहारातील प्रथिने,स्निग्ध पदार्थ,कर्बोदके यांचा योग्य समावेश असणे याचे फायदे लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती व सादरीकरण यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच निरोगी आरोग्य जागरूकता कार्यक्रम व आहारातील बदल केवळ एक दिवस घेऊन चालत नाही तर सातत्याने विद्यार्थ्यांनी हे समीकरण राखावे तसेच अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढीचे वयोगट लक्षात घेता प्रोटीनयुक्त आहार व रोग प्रतिकारशक्ती आपल्याला सकस ठेवण्यासाठी कशी मदत करते याबाबत सांगत निरोगी आरोग्य यासाठी शुभेच्छा दिल्या
.यावेळी महाविद्यालयातील प्रा.श्वेता मदने, प्रा.अवंती बिडकर, प्रा.सावळे स्वप्नाली, डॉ.राहुल मोरे, डॉ.महेश कराळे, डॉ.ललित ठाकरे, प्रा.श्वेता लोखंडे, प्रा.मंगेश सुगरे प्रा.कुलकर्णी, श्री.पाटोळे, श्री.मदने, श्री.टार्फे, श्री.चित्ते,श्रीमती हालसे इत्यादी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी या सकस आहाराचा अस्वाद घेऊन भरभरून प्रतिसाद दिला.