लातूर- लातूर जिल्हा वकील मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अँड अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चे उमेदवार
अध्यक्ष पदासाठी अँड विठ्ठल देशपांडे ७९४ , उपाध्यक्ष अँड किरण किटेकर ४३७ , सचिव अँड दौलत दाताळ ५१७ , सहसचिव अँड आश्विन जाधव ६६६ सर्वाधिक मते , ग्रंथालय सचिव अँड खलिल शेख ४४४ , कोषाध्यक्ष अँड दिपक माने ५४७ मते घेऊन विजयी झाले आहेत तर बिनविरोध महिला उपाध्यक्ष अँड संगीता इंगळे (बिरादार), सहसचिव अँड सुचिता कोंपले यांची निवड झाली आहे.
मतदान प्रक्रिया दिनांक ०८.०४.२०२२ रोजी
सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू होते , एकूण मतदार म्हणुन १४८४ जनाची नोंदणी होती त्यापैकी ११४५ मतदारांनी मतदानाचा हकक बजावला आहे त्यात १५ मते बाद ठरवण्यात आली आहेत
मतदान मोजणी रात्री उशिरापर्यंत चालली निवडणूक निर्णय अधिकारी अँड विजयकुमार सलगरे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अँड संजय सितापुरे, अँड मेघना पाटणकर, अँड राजेंद्र पाटील, अँड प्रशांत मरळे, अँड प्रतिभा कुलकर्णी, अँड युसुफ पटेल, अँड महेश कापरे यांनी काम पाहिले तर त्यांना कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मसलगे, सुशील सुरवसे, विष्णु जाधव यांनी सहाय्य केले तर सर्व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार मावळत्या कार्यकारिणीने पेढा भरवुन स्वागत केले आहे