लातूर शहर महानगरपालीकेच्या महिलासाठी मोफत सिटी बस सेवेचा
लातूर – हरंगुळ (बू) येथे ॲड. किरण जाधव यांच्यासह
विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर प्रतिनिधी : गुरूवार दि. २४ मार्च २०२२ :
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहर महानगरपालीकेची देशातली पहिली महिलासाठी मोफत सिटी बस सेवा सुरू झाली आहे. या सेवेचा लातूर – हरंगुळ बु. येथे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या सह विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला आहे.
लातूर शहर महानगर पालीकेच्या वतीने लातूरशहरा लगत असलेल्या विविध गावाना नागरी सुविधा मनहानगरपालीका पूरवीत आहे. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा लातूर शहरालगतच्या गावानाही दिली जात आहे. हरंगुळ बु. येथील महिलांना लातूर येथे येजा करण्यासाठी ही मोफत सेवा मिळावी यासाठी मोफत सिटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरूवार दि. २४ मार्च रोजी हरंगुळ बु. येथे लातूर – हरंगुळ बु. सेवेचा शुभारंभ लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सुर्यकांत सुडे, चंद्रकांत पाटील, रामचंद्र सुडे, सुर्यकांत पाटील, भिमा झुंजारे, मधूकर खरोसे, हंसराज बिर्ले, महालिंग पाटील आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हरंगुळ बू. येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
————————