23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्यापालकमंत्री देशमुखांनी केली महामार्गाची पाहणी

पालकमंत्री देशमुखांनी केली महामार्गाची पाहणी

लातूर जिल्हयातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे 

काम दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करावे 

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून 

लातूर ते ममदापूर दरम्यान कामाची पहाणी

  • लातूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर भविष्यातील शहराचा विस्तार आणि नागरिकांची मागणी लक्षात घेता उडडानपूलाचा प्रस्ताव कायम ठेवावा
  • शहराजनीक काही भागात ३० मीटरचा रस्ता होत असल्याचे निर्दशनास येत आहे यात तातडीने दुरूस्ती करावी
  • महामार्गावरील व्हेइकल अंडरपास योग्य ठिकाणी व तांत्रिकदृष्टया योग्य पध्दतीने बांधावेत 
  • महामार्गावरील सर्व्हिस रोडचे योग्य पध्दतीने नियोजन करावे 

लातूर  प्रतिनिधी : शनिवार दि. १९ मार्च २०२२ :

    लातूर जिल्हयातून जाणाऱ्या तुळजापूर – नागपूर (एनएच ३६१) हा महामार्गाचे काम  दर्जेदार पध्दतीने व जलद गतीने पूर्ण करावे असे, निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. 

   पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हयातून जाणाऱ्या तुळजापूर – नागपूर (एनएच ३६१) या महामार्गाच्या कामाची लातूर – भातागळी – महमदापूर दरम्यान आज सकाळी शनिवार दि. १९ मार्च रोजी पहाणी केली. मांजरा नदीवरील पूल आणि महमदापूर गावानजीकचा उडडानपूल या संदर्भाने गावकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेऊन काही सुचना केल्या, हे एकूण काम दर्जेदार आणि जलद गतीने व्हावे असे सांगितले.

  यावेळी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी भविष्यातील शहराचा विस्तार आणि नागरिकांची मागणी लक्षात घेता संपूर्ण शहरादरम्यान उडडानपूलाचा प्रस्ताव कायम ठेवावा या संदर्भात केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे नव्याने विनंती व पाठपूरावा करण्यात येईल असे सांगून शहराजनीक काही भागात रस्त्याची रूदी ६० मीटर शक्य असतांना तेथे ३० मीटरचा रस्ता होत असल्याचे निर्दशनास येत आहे यात तातडीने दुरूस्ती करावी, महामार्गावरील शहरातील व गावाजनीकचे व्हेइकल अंडरपास योग्य ठिकाणी व तांत्रिकदृष्टया योग्य पध्दतीने बांधावेत, महामार्गावरील सर्व्हिस रोडचे योग्य पध्दतीने नियोजन करावे आदी सुचना यावेळी संबंधितांना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत.   

  यावेळी  नॅशनल हायवेचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील पाटील, उपप्रकल्प व्यवस्थापक सुरज चव्हाण, गंगामाई कन्स्ट्रक्शनचे सुनील देशमुख, महापौर विक्रात गोजमगुंडे, विरोधी पक्ष नेते दिपक सुळ, लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, उपसभापती मनोज पाटील, रेणा कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, सचिन दाताळ, परमेश्वर पाटील, बाबासाहेब गायकवाड, सतीश शिंदे, सतीश पाटील, दगडूसाहेब पडिले, रामचंद्र पाटील, नंदकुमार देशमुख, रमाकांत वंगवाड, ज्ञानोबा गवळी, मंडळ अधिकारी सुरेश गवळी, तलाठी रेणुका पुरी आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते भातांगळी, ममदापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

———————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]