95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्वतयारीसाठी उदगीर येथे जिल्हा ग्रंथालय संघाची बैठक संपन्न..
उदगीर,-( प्रतिनिधी )
-95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-2022 उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व जिल्हा ग्रंथालय संघाची बैठक पार पडली.
अध्यक्षस्थानी संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर होते.मंचावर सहसचिव डाॅ.श्रीकांत मध्वरे,सदस्य अँड.अजय दंडवते,प्रशांत पेन्सलवार,प्रभारी प्राचार्य डाॅ.आर.के.मस्के,मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकिले,कार्याध्यक्ष डाॅ.ब्रिजमोहन झंवर,उपाध्यक्ष युवराज जाधव,सूर्यकांत शिरसे,कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे,सदस्य एल.बी.आवाळे,किरण बाबळसुरे,विठ्ठल कटके,शादुल शेख,जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे,ग्रंथालय निरीक्षक हरिश्चंद्र डेंगळे,गुप्तलिंग स्वामी,यशोदीप सार्व.वाचनालय तथा इंदिरा सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.काळे,ग्रथपाल प्रशांत ( रामभाऊ ) साळुंके यांची उपस्थिती होती.
राम मोतीपवळे यांनी प्रास्ताविकात म्हणाले,जिल्हा ग्रंथालय संघ साहित्य संमेलन नियोजनात तन, मन, धनाने सहभागी राहाणे आवश्यक आहे.तसेच,राम मेकले म्हणाले,ग्रंथालय चळवळ यावर परिसंवाद ठेवावा,स्व.ञ्यंबकदास झंवर यांचे नाव दालनाला देण्यात यावे.यावेळी पदाधिकार्यांच्यावतीने मागण्यांचे निवेदन बस्वराज पाटील नागराळकर यांना देण्यात आले.
प्रभाकर कापसे म्हणाले,ग्रंथपाल हा लेखकांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवत असतात.जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे यांनी साहित्य संमेलनातून दुर्मिळ,दर्जेदार ग्रंथ ग्रंथालयांनी खरेदी करावे असे आवाहन केले.डाॅ.ब्रिजमोहन झंवर म्हणाले की,ग्रंथालय चळवळ संमेलनाचा प्रचार-प्रसार करेल.