मुलींच्या वसतिगृृहासाठी दापका ग्रामपंचायतीकडून मोफत जागा..
काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष लाला पटेल यांच्याकडून दहा हजार फुटांच्या भूखंडाचे दानपञ..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-मराठा बहुजन समाजातील होतकरू मुलींच्या शिक्षणासाठी मराठा सेवा संघाच्यावतीने शहरात वसतिगृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी दापका ग्रामपंचायतीचे प्रमुख तथा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष लाला पटेल यांनी शहरालगतचा दहा हजार फुटांचा भूखंड दानपञ करून देण्याचे जाहीर केले आहे.तिथे लवकरच माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने शंभर मुलींना राहण्यासाठीचे वसतिगृृह उभारले जाणार आहे.
ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी निलंगा शहरात यावे लागते.सुविधाअभावी अनेक मुलींवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.त्यामुळे मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने शहरात मुलींचे सुसज्ज वसतिगृह उभारण्याचा संकल्प करण्यात आला.त्यासाठी उत्सुर्त मदत मिळत असून कांही दिवसांतच दहा लाख रूपये संकलन झाले.
जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सेवा संघाच्यावतीने तहसिलदार गणेश जाधव आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या हस्ते लाला पटेल यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य,माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ,प्रा.दयानंद चोपणे,डाॅ.शेषराव शिंदे,डाॅ.उध्दव जाधव यांच्यासह सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————————————
तहसिलदार गणेश जाधव आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या हस्ते लाला पटेल यांचा सत्कार..
जागेअभावी काम मार्गी लागत नसल्याचे सेवा संघाच्या पदाधिकार्यांनी तहसिलदार गणेश जाधव आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांना सांगितले,तेव्हा त्यांनी मुलींच्या वसतिगृृृहाची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असल्याने दापका ग्रामपंचायतीचे प्रमुख लाला पटेल यांना जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
लाला पटेल वसतिगृृृहास माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव देण्यात यावे,अशी अपेक्षा व्यक्त करीत शहरालगतची 10 हजार फुटांची जागा तत्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला,लवकर याठिकाणी वसतिगृृह उभारले जाणार आहे,असे सेवा संघाचे जिल्हा सचिव एम.एम.जाधव यांनी सांगितले.
———————————————————————