मुंबईनंतर.लातूरात फेरीवाला धोरण

0
401

फेरीवाल्यांना कमी व्याजदराने

अर्थसहाय्य देणारी योजना आखावी

पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या हस्ते

फेरीवाल्यांना स्मार्ट ओळखपत्रांचे वितरण

·मुंबईनंतर लातूर शहरातच फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी मुर्त स्वरुपात

·

लातूर (प्रतिनिधी) : दि. १ 

  फेरीवाले हे शहराच्या विकासात महत्वाची भुमिका बजावत असातात़ परंतु, त्यांना त्यांच्या व्यवसायात आर्थिक अडचणी असतात़ पथविक्रेत्यांच्या (फेरीवाल्याचा) आर्थिक अडचणी दुर करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना कमी व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणारी योजना आखावी, त्यास पुर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले़ .

 लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत लातूर शहरातील फेरीवाल्यांना स्मार्ट ओळखपत्र व व्यवसाय प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि़. ३१ जानेवारी २२ रोजी सायंकाळी येथील गंज गोलाईत झाले़ त्या प्रसंगी पालकमंत्री ना. अमित देशमुख बोलत होते़.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर विक्रांत गोजमगुंडे होते़, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़. किरण जाधव, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, अहेमदखा पठाण, युनूस मोमीन, सचिन बंडापल्ले, कैलास कांबळे, विजयकुमार साबदे, पथविक्रेता समितीचे सदस्य गौस गोलंदाज, हकीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़. 

मुंबईनंतर लातूर शहरातच फेरीवाला

धोरणाची अमंलबजावणी मुर्त स्वरुपात

  यावेळी बोलतांना पुढे म्हणाले, बहुतांश फेरीवाले विक्रेते, व्यावसायीक हे भाड्याच्या घरात राहतात़ त्यांना स्वत:चे घर असावे, या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरकुल योजना असावी, त्याकरीता लातूर महानगरपालिकेने नोडल एजन्सी म्हणून काम करावे, असे नमुद करुन, मुंबईनंतर लातूर शहरातच फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी मुर्त स्वरुपात सुरु झाली आहे़. सामान्य माणसांची नाळ जुळलेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महानगरपालिकेत काम करीत असल्यामुळेच हे शक्य झाले आहे़. तळागाळातील माणसाला आधार देण्याचे काम या माध्यमातून झाले आहे़. आपल्या माणसांचा विचार महानगरपालिका करते हेच लातूरचे वैशिष्ठ्ये आहे़. फेरीवाले स्वत:चा व्यवसाय उभा करुन त्यांच्या पुढच्या पिढीला उभे करण्याचे काम करीत असतात़ त्यांना मदत करणे गरजेचे असते, असे ही पालकमंत्री ना. अमित देशमुख म्हणाले़.

गंजगोलाईतील दुकानदारांना आता

सुलभ व सुसुत्रितपद्धतीने भाडे

 गंजगोलाईच्या सुशोभिकरणाचे अतिश्य चांगले काम झाले़ मागच्या काळात गंजगोलाईतील दुकानदारांना दुकाने रिकामी करा, आम्ही दुकानाचे लिलाव करु, अशी भूमिका घेण्यात आली़ त्याविरोधात आम्ही मनपावर मोर्चा काढला़ तो संघर्षाचा काळ होता़. आज सर्व परिस्थिती बदलली आहे़ गंजगोलाईतील दुकानदारांना आता सुलभ व सुसुत्रितपद्धतीने भाडे देण्याचा निर्णय झाला आहे, असेही पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले़. 

  यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहराचा सर्वांगीण विकास केला जात असल्याचे नमुद केले़ उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक आयुक्त अमन मित्तल यांनी केले़ यावेळी पथविके्रत्यांना स्मार्ट ओळखपत्र, व्यवसाय प्रमाणपत्र व गरजूंना चादरी वितरीत करण्यात आल्या़ कार्यक्रमास अ‍ॅड़ फारुक शेख, आसिफ बागवान, इम्रान सय्यद, राजू गवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते़ प्रारंभी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, गौस गोलंदाज, इब्राहीम बाबा, इस्माईलबाबा, जफर पटवेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले़ 

लातूर जिल्ह्यात सुरु असलेली

फसवणुक, लुबाडणुक बंद झाली

  जिल्ह्यात कोठेही लुबाडणुक नाही मागच्या काळात जिल्ह्यात सर्वत्र फसवणुक, लुबाडणुक मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती़ राज्यात महाविकास आधाडीची सत्ता स्थापन झाली आणि लातूर जिल्ह्यात सुरु असलेली फसवणुक, लुबाडणुक बंद झाली आहे़. व्यवसायीक, व्यापारी, उद्योजकांना आता चांगल्या वातावरणात आपला व्यवसाय, उद्योग करता येऊ लागला आहे़ कायदा व सुववस्था कायमस्वरुपी चांगली राहावी, अशा आमचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले़. 

कचºयापासून कोळ निर्मितीचा प्रकल्प लवकरच

  कचºयापासून कोळसा निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प लातूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात लवकरच साकारला जाणार आहे़ त्यामुळे कचºयाची समस्या मिटेल आणि कचºयापासून निर्माण होणाºया कोळश्यापासून इंधनाचे नवे साधन निर्माण होईल, असे पालकमंत्री अमित देशमुख यावेळी बोलताना म्हणाले़ 

———–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here