शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
नगरपंचायत निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या
नूतन नगरसेवकांचे केले अभिनंदन, पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी रवीवार दि. ३० जानेवारी २२:
जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याच्या दृष्टीने शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले. ते नगर पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नुतन नगरसेवक यांच्या भेटी प्रसंगी बोलत होते.

लातूर जिल्हयातील नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत देवणी, चाकूर, शिरूरअनंतपाळ येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीने विजय मिळवला. या निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनीर्वाचीत नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची शनिवार दि. २९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या या महाविकास आघाडीच्या सर्व नुतन नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन नगरसेवकांनीही पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी नगरपंचायत निवडणुकीत संधी देऊन निवडून आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे अभय साळुंके, मल्लिकार्जुन मानकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण राष्ट्रवादीचे लातुर जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, चेअरमन गणपत बाजुळगे, शिवसेना लातूर जिल्हा महिला संघटक शोभा बेंजरगे, काँग्रेसचे डॉ.अरविंद भातांब्रे, चाकुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे, शिवसेना शिरूर आनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे, शहर प्रमुख सतीश शिवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर आनंतपाळचे शहरअध्यक्ष अनिल देवग्रे, काँग्रेसचे शिरूर आनंतपाळ शहर अध्यक्ष अशोक कोरे, काँग्रेसचे चाकूर शहराध्यक्ष पप्पूभाई शेख, करीम गुळवे, मिलिंद महालिंगे रेनापुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, देवणी काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद तांबोळी, वैजनाथ लुल्ले, सचिन बंडापले, बादल शेख आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीतील नूतन नगरसेवक, पदाधिकारी, निरीक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते.


देवणी नगरपंचायत अपक्ष नूतन नगरसेवक अमित सूर्यवंशी यांनी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पालकमंत्र्यांनी काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
———————