26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसाहित्यनवीन लेखमाला मनांतरी

नवीन लेखमाला मनांतरी

मनांतरी

नवीन लेखमाला
मनांतरी
वाचकहो नमस्कार.
नवीन वर्षात आम्ही नवनवीन उपक्रम घेऊन तुमच्या भेटीला येत आहोत.
आजपासून दर रविवारी अकोला येथील लेखिका, कवयित्री, प्राध्यापिका जयंती देशमुख यांची मनांतरी ही लेखमाला सुरू करीत आहोत.
गोपाळ कुळकर्णी
समुह संपादक

मन”

मन म्हणजे काय हो ? ,
त्याला कोणी पाहिलं नाही ,
कसं असते ते माहीत नाही,
पण त्याला खूप मान्सनमान असतो.

कधी ते लिक्विड असतं,
“मन भरलं नाही” असं म्हणतो आपण,

कधी ते सॉलिड असतं, “मनावर खूप ओझं आहे”,

कधी ते घर होतं, “मेरे मन में रहने वाली”,
कधी ते तहानलेल असतं, “मेरा मन तेरा प्यासा” ,

कोणी त्याला मोरा ची उपमा देतं, “मन मोराचा कसा पिसारा फुलला”.

असं हे मन आयुष्य भर आपल्याला झूलवत ठेवतं ,
कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्या च्या मनाप्रमाणे आपण वागत असतो,

हे “मन” कधीच स्थिर का बरं नसतं ? ,

ते कधी प्रेयसी च्या तोंडातून मंदिर रूप धारण करतं
आणि ती म्हणते “मन में तुझे बिठाके …”

काही जण असतात की त्याच्या “मनात”काही रहात नाही तर काही “मन कवडे” असतात.

मन दिसत तर नाही
… पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं
तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.

“मनात आणलं तर काहीही होऊ शकतं ..”

जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी राहतो ,
दुसऱ्या च भलं करतो, म्हणुन म्हंटलं जातं, “मन चंगा तो ..”

कधी हे खूप डेंजर असतं ,
स्वतः कडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि “मनातील” राग दुसऱ्याचे नुकसान करतं .

याचा वेग मोजण्याच यंत्र अजून अस्तित्वात आलेल नाही,
तरी लोकं म्हणतात, “मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक”.

“मन” दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं , कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात, पण ते निर्मळ असतं, पारदर्शक असतं ,

म्हणूनच आपण म्हणू शकतो की “मोरा मन दर्पण कहलाये.”
अशा या न दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या “मनाला” काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात
“मेरे मनं ये बंता दे तू,किस और चला हैं तू..”

पण “मनाप्रमाणे” जगता आलं नाही तर
त्याला काही अर्थ आहे का ?
मग …
मनं मनास उमगत नाही..
आधार कसा शोधावा…
“मनसोक्त” जगा, आनंदी जगा.

*लेखन: जयंती देशमुख*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]