– माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.29-01-2021
राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.मनोहर पर्रिकर यांनी आपल्या कूशल, समर्पित व प्रामाणिक कर्तबगारीतून गोव्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगली निर्माण केली असून क्राईम, डिटेक्शन (गुन्ह्याच्या शोध) मध्ये गोवा राज्य देशात पहिले आलेले आहे. गोव्याला बेस्ट ट्युरीस्ट डिस्टीनेशन पुरस्कार मिळाला या कामाला पुढे घेऊन जाण्याचे कार्य सध्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे करीत आहेत. त्यामुळे गोव्याला जागतिक पर्यटन राज्याचा दर्जा कायम ठेऊन राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपाला साथ द्या, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते सांगेव मतदार संघाचे उमेदवार सुभाष फलदेसाई यांच्या प्रचारार्थ मानगळ येथे प्रचारसभेत बोलत होते. प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासूदेव गावकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे विभागप्रमुख दयानंद फलदेसाई, मंडळाध्यक्ष शशिकांत गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, इंडिया टुडे तर्फे घेतल्या जाणार्या एन्युअल स्टेट ऑफ द स्टेटस परीक्षेेतील सवोत्कृष्ठ कामगिरी करणारे सर्वात लहान राज्य आहे. मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी देशात कृषी, शिक्षण, उद्योग, ग्रामीण व शहरी विकासासाठी परिवर्तनवादी योजना देशात राबविल्या जात आहेत. कोव्हिड संसर्गामध्ये भारताने जगात उत्कृष्ठ कार्य केले व जगातील ब्राझीलसह अनेक देशांना औषधांचा पूरवठा केला. त्यामुळे अनेक देशांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत.यावेळी या प्रचार सभेला सांगेव मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
स्वामी विवेकानंदाची भविष्यवाणी मोदीजीच पूर्ण करतील
मॉर्निंग कन्स्टंट पॉलिटेक्निक इंटेलिजन्सी संस्थेने जागतिक स्थरावर जगातील नेत्यांचा सर्वे केला. त्यात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले. त्यांना 71 टक्के गुण मिळाले. त्यामुळे भारतीयांचा गौरव जगात वाढवून भारत जगाचे नेतृत्व करण्याचे राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदाची भविष्यवाणी मोदीजी पूर्ण करतील असे प्रभावी विचार गोवा राज्याचे प्रभारी तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
———————————————————–