*आ.निलंगेकर, आ.कराड यांचे आवाहन*

0
237

*लोकशाही पॅनलला साथ देऊन सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडावा-आ निलंगेकर, आ कराड यांचेआवाहन*

लातूर…लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील लोकशाही बचाव पॅनलच्या प्रचारअर्थ भाजपाचे नेते माजी पालकमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशअप्पा कराड यांनी मंगळवारी चाकुर आणि अहमदपूर येथे मतदारांच्या भेटी घेऊन लोकशाही बचाव पॅनलची भूमिका विशद केली व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन केले.


राज्यात बँक सर्वात चांगली चालते तर मग निवडणुकीला सामोरे जाण्यास का घाबरले, मतदाराचा हक्क का हिरावून घेतात. खर तर सहकार क्षेत्रात निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत. सहकार मोडीत काढायचा आणि स्वतःचे खाजगी उद्योग चालू ठेवायचे ही देशमुखाची नीती यापुढे चालू देणार नाहीत जिल्हा बँक शेतकऱ्याच्या नावावर असताना पतपुरवठा मात्र मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना केला जातो तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज किती जणाला दिले असा प्रश्न उपस्थित करून केवळ शेतकऱ्यासाठी घोषणा करायच्या आणि आपले उद्योग धंदे चालवायचे हा प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी लोकशाही पॅनल ला साथ द्यावी कपबशी या चिन्हाला मत देऊन लोकशाही जिवंत ठेवावी असेही आवाहन त्यांनी केले.


चाकूर अहमदपूर येथील बैठकीस आ निलंगेकर आणि आ कराड यांच्या समवेत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबकआबा गुट्टे, अशोक काका केंद्रे जिप सभापती रोहिदास वाघमारे भागवतराव सोट ज्ञानेश्वर चेवले उमेदवार ओमप्रकाश नंदगावे सुरेखा रमाकांत मुरुडकर बाबु खंदाडे वसंतराव दिघोळे बबलू पठाण भगवान सोळुंके तुकाराम मद्दे संतोष माने सिद्धेश्वर पवार प्रशांत बीबराळे सजन लोणावळे शिवाजी बैनगिरे हनुमंत देवकते श्याम मुंजाने दयानंद पाटील रामदास खंदारे व्यंकटराव सोनवणे महेश पाटील गोविंद कांडनगिरे जयश्री केंद्रे गयाताई शिरसाट निळकंठ गोरटे रामानंद मुंडे रमेश कांबळे दत्तात्रेय जमालपुरे प्रताप पाटील यांच्यासह मतदार भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here