*शेतकऱ्यांमध्ये नाराजी*

0
216

अतिवृृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मांजरा आणि तेरणा नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या जमिनी अकडून,खरडून मातीसह वाहून गेल्याचे पंचनामे करणार्‍या ; संबधित अधिकार्‍यांकडून नुकसान भरपाईचे क्षेञ कमी दाखवले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी..

शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करण्यासंदर्भात ; तहसीलदार गणेश जाधव यांना माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे भाजपाच्या वतीने निवेदन सादर..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-अतिवृृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे सप्टेंबर महिन्यात आलेल्या अस्मानी आणि सीलतानी संकटाने शेतकर्‍यांच्या शेतातील नुकसान भरपाईच्या अनुषंगाने कसलीही पुर्वसूचना न देता मांजरा व तेरणा धरणातून अवास्तव पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीकाठची हजारो एकर जमीन महापुराने माती सह जमीन उकडून,खरडून पिके वाहून गेली शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला अशावेळी शेतकऱ्यांना मदतीचा हात शासनाकडून मिळावा तात्काळ शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे यासाठी लातूर येथे लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने 72 शेतकऱ्यांचे 72 तास अन्नत्याग आंदोलन हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. शेतकऱ्यांना हे.

आंदोलनात 50 हजार रुपये व नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात यावी व विमा देखील तात्काळ द्यावा अशी मागणी करण्यात आली शासनाने थोडीफार मदत जाहीर केली. मांजरा व तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले त्या अनुषंगाने नदीकाठच्या शेतकऱ्याच्या शेतीची झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत केले जात आहे.

नदीकाठच्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करत असताना संबंधित कर्मचारी अधिकारी शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता नुकसान जास्त जास्त क्षेत्राची झाले असतानाही कमी क्षेत्राचे पंचनामे केले जात आहेत अशी तक्रार नदीकाठची शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्याकडे केली आहे त्यामुळे माननीय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर वतीने आज निलंगा येथे तहसील कार्यालयामध्ये मान्य तहसीलदार गणेश जाधव यांना निवेदन देऊन नुकसानीचे पंचनामे होत असताना योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा रीतीने पंचनामे योग्य ते करावी अशी मागणी करण्यात आली.

संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील व शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, जिल्हा चिटणीस शाहूराज पाटील, शहराध्यक्ष अँड. वीरभद्र स्वामी,तालुका उपाध्यक्ष युवराज पवार व शेतकरी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here