मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी झाडे लावून वाढदिवस साजरा केला.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम
लातूर , बार्शी रोडवरील रंजनादेवी देशमुख नगर येथे ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून आज ६२ मोठी झाडे लावण्यात आली. महानगरपालिका लातूर चे आयुक्त अमन मित्तल यांनी वाढदिवस निमित्ताने श्रमदान करून झाडे लावली, टँकरद्वारे झाडांना पाणी दिले.
सप्तपर्णी, बकुळ, बहावा, कडुनिंब, करंज, गुलमोहर, पिचकारी अशा विविध प्रजातींची पर्यावरण पूरक मोठी झाडे लावण्यात आली. रंजनादेवी नगरच्या सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन वृक्ष संगोपन करण्याची जवाबदारी घेतली.
यावेळी लातूर जिल्हा पूर्व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे उपस्थित होते. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या अविरत ८६८ दिवसांच्या कार्याचे कौतूक करून वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, शहर स्वच्छता कार्याबद्दल ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, प्रो. मीनाक्षी बोडगे, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित,, महेश गेलडा, राहुल माने, विदुला राजमाने, प्रतीक्षा मरकड, पूजा पाटील, कपिल काळे, मुकेश लाटे, कांत मरकड, नागसेन कांबळे, मुकेश लाटे, असिफ तांबोळी, अभिजित चिल्लरगे,भगवान जाभाडे, विक्रांत भूमकर, कृष्णा वंजारे, अरविंद फड, बाळासाहेब बावणे, आकाश सावंत, दयाराम सुडे, मिर्झा मोईझ, आनंद चोरघडे यांच्यासोबत परिसरातील डॉक्टर शैलेश कचरे, ऍड. हंसराज साळुंखे, कुलदीप देशमुख, बालाजी पसारे, हांसराज पुजारी, संतोष कचरे, प्रकाश जाधव, शैलेश पाटील, बळवंत देशमुख, दौलत शामराव देशमुख यांनी श्रमदान करून वृक्षारोपण करिता हातभार लावला.