माध्यम वृत्तसेवा
● पीएलजीपीएल माजी विद्यार्थ्यांचा रविवारी लातूरात मेळावा
●आ.सतिष चव्हाण,सुधीर गाडगीळ उपस्थित राहणार
लातूर; दि. १६- ( प्रतिनिधी)- पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थीं मेळावा येत्या रविवारी लातूरात आयोजीत करण्यात आला आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभियंते श्रीकांत हिरेमठ यांनी दिली.
रविवार दि. १७ आक्टोबर २०२० रोजी सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतच्या परिसरात या मेळाव्याचे आयोजनकरण्यातआलेआहे.मेळाव्यानंतर स्वानंद मंगल कार्यालय येथे कोरोना योध्याचा सत्कार आणि प्रा.रघुनाथ उर्फ नंदु कुलकर्णी यांचा शासकीय सेवा निवृत्ती निमित्ताने साहित्यिक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते व मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिष चव्हाण यांच्या उपस्थितीत ऋणनिर्देश सोहळा संपन्न होणार आहे.या सत्कार सोहळ्यानंतर सुधीर गाडगीळांची मुलाखत-गप्पाष्टक होणार आहे.
तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत हिरेमठ,संजय अयाचित,संजय जेवरीकर, महादेव मुळे, ओमप्रकाश झुरळे,महेंद्र जोशी व प्राचार्य नितनवरे यांनी केले आहे.