सोनपेठ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशीच द्या…
निलंगा भाजपा युवती मोर्चाची मागणी
निलंगा/प्रतिनिधी — परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील एका आल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करून न्याय द्यावा अशी मागणी भाजपा युवतु मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा याना केली आहे.
परभणी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमांनी क्रूर अत्याचार करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. अशा नराधमांना अध्याप अटक झाली नसून त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केली आहे.त्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या तीन नराधमांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना माजपा युवती मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणीता केदारे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास देण्यात आले आहे.
या निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,बाळासाहेब पाटील,राम पाटील,नागेश पाटील,सुमित इनानी,सुनंदा जाधव,हेमा कांबळे,श्रूतूजा पाटील,सिमा कांबळे,पोर्णिमा काटगावकर,अनिता येळापूरे,तम्मा माडीबोने,रवि फुलारी,अदीच्या स्वाक्षरी आहेत.