36.7 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeराजकीयकाँग्रेसचे अनोखे आंदोलन

काँग्रेसचे अनोखे आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक शिवरायांना निवेदन देत केले अनोखे आंदोलन

लातूर ;( माध्यम वृत्तसेवा):–शेतकरी, शेतमजूरांना फसवे आश्वासन देत सत्तेवर आरुढ झालेल्या महायुती सरकारच्या फसव्या धोरणाविरोधात जिल्हा काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी महायुतीच्या जाहीरनानाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा द्यावा, कृषी अवजारावरील जीएसटी रद्द करावी, सोयाबीन संशोधन केंद्र हे लातूरला व्हावे, देवणी वळू संशोधन केंद्र पूर्ववत सुरू करावे, शेतकऱ्यांना 2 वर्षांपासून ठिबक सिंचनाचे अनुदान मिळत नाही, त्याची देयक शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावीत , सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारामध्ये विकले आहेत अशा शेतकऱ्यांना भाव फरक तात्काळ मिळावा, दूध दरवाढ लागू करावी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ना सरकारला चाड ना प्रशासनाला घेणदेणं याचा निषेध व्यक्त करत बळीराजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे न देता छत्रपती शिवरायांना अर्पण करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी सरकारच्या दुटपी धोरणांचा निषेध करत असताना काँग्रेस पक्षच गोर गरीब, शेतकऱ्यांचे कल्याण करू शकतो असे सांगून या आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेत असलेले सरकार हे चोरांचे आहे, यांनी पीकविमा चोरला, अनुदानाच्या रकमा गायब केल्या आपल्या मागण्यांचे निवेदन यांना न देता रयतेचे राजे शिवरायांना देऊ असे सांगत, ही स्तुत्य संकल्पना जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी सुचविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी खा. शिवाजीराव काळगे यांनी संसदेत शेतकरी,, शेतमजूर आणि गोर गरिबांच्या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याची खंत व्यक्त केली, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकार विरोधात लढा तीव्र करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, विजय देशमुख, रवी काळे, शीलाताई पाटील, प्रवीण सूर्यवंशी,अनिल चव्हाण, प्रवीण बिरादार, सिराजुद्दीन जहागीरदार, प्रा.एकनाथ पाटील, विपुल हाके,राम स्वामी,अरविंद भातांब्रे,प्रवीण पाटील,किशोर टोम्पे,रामराजे काळे,सुभाष घोडके,विजयकुमार पाटील, कल्याण पाटील,मारुती पांडे, दत्तोपंत सूर्यवंशी, अजहर हाश्मी,महेश धूळशेट्टी, विलास पाटील,हुसेन शेख,चंद्रकांत मद्दे, उदयसिंह देशमुख,विद्याताई पाटील,सईताई गोरे, पल्लवी जाधव, लाला पटेल, बाळासाहेब सांगवे,श्याम सूर्यवंशी, यश चव्हाण,प्रकाश मिरगे,किरण बाबळसुरे,माधव बिराजदार, खूनमीर मुल्ला, जयराज कसबे, मुरलीधर सोनटक्के,अशोक बनसोडे,कमलाकर अनंतवाड,किरण मुक्तापुरे,रोहित पाटील, संजय लोंढे,सुशील पाटील,रवी पाटील,सुमित आरीकर,यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष,पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]