प्रोफेसर डॉ सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना इंटरनेशनल सोशल इम्पॅक्ट लिडर अवार्ड हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेत प्रधान
(अनघा गायकवाड यांजकडून)
अमेरिका (बोस्टन);-लातूर लोकसभा मतदार संघाचे,भारतीय जनता पार्टीचे संसदरत्न माजीलोकप्रिय खासदार,प्रोफेसर,डॉक्टर,ॲडव्होकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना अमेरिकेच्या बोस्टन शहरातील प्रसिद्ध अशा हार्वर्ड यूनिवर्सिटी मध्ये लंडन ऑर्गेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट च्या वतीने सन २०२४ चा इंटरनेशनल सोशल इम्पॅक्ट लीडर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार २४ देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्याना दिला.
हा सोशल इम्पॅक्ट लीडर पुरस्कार भारतातून एकमेव डॉ सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन लंडन ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट नी हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथील ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स या कार्यक्रमा मध्ये अवार्ड चे मानचिन्ह देऊन युके चे महापौर,बोस्टन चे महापौर,यूके चे किंग चार्ल्स चे प्रतिनिधी आणि LOSD च्या सीईओ तथा डायरेक्टर ऑक्सफर्ड च्या प्रोफेसर डॉ परिन सोमणी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन जगातील अनेक देशाच्या प्रतिनिधी,उद्योजक,लेखक यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
डॉ सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना या पूर्वी अनेक राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय पुरस्कार,संसद रत्न पुरस्कार,असे अनेक पुरस्कार त्यांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय कामासाठी दिले आहेत. प्रामुख्याने खासदार असताना लातूर लोकसभा मतदार संघात केलेले विकास कामे,रेल्वे स्टेशन आधुनिकीकरण,व्हीआयपी लाउंज,सोलापूर विभागात सर्वात मोठे वेटिंग हॉल,हिंदी लायबरी,रेल्वे चे विद्युती करण, लातूर,लातूर रोड,उदगीर रेल्वे स्टेशन वर नवीन प्लेटफॉर्म निर्माण चे काम,लातूरला रेल्वे बोगी कारखाना, २०० बेड चे सूपर स्पेसिलिटी शासकीय हॉस्पिटल, पासपोर्ट ऑफिस,विद्यार्थ्यांसाठी NEET EXAM सेंटर सुरू केले,जलयुक्त शिवारासाठी खासदार निधीतून करोडो निधी दिला,सरकारी मेडिकल कॉलेज मधे आय सी यू चे निर्माण,रत्नागिरी नागपूर,लातूर टेंभुर्णी हायवे काम सुरू करण्याची वेळो वेळी लोकसभेत मागणी केली, लातूर ला एक ट्रेन चालायची डॉ सुनील गायकवाड यांच्या खासदारकी च्या काळात त्यांनी २१ ट्रेन सुरू केल्या.जवळपास ७०० गावांमध्ये खासदार निधीचे वाटप केले.
विमान सेवा सुरू करण्यासाठी लोकसभेत प्रयत्न केले.विभागीय पोस्ट कार्यालय.,आदी कामाची दखल घेऊन प्रोफेसर डॉ ॲडव्होकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना इंटरनेशनल सोशल इम्पॅक्ट लिडर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
त्यांच्या पुरस्कारा बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.