जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
लातूर, दि. २६ : भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृत महोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने आज संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरीक यांच्यापर्यंत पोहचावीत, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथेही भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच येथील भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेला पुष्पांजली अर्पण केली. तसेच उपस्थित नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.