24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeशैक्षणिक*'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सहभागी व्हावे !*

*’मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सहभागी व्हावे !*

· सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांसाठी अभियान

लातूर, दि. 31 (वृत्तसेवा ) : सन 2023-24 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले.

या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात आली. आता सन 2024-25 मध्येही ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा दुसरा टप्पा काही नवनवीन उपक्रमासह राबविण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.

अभियानाची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे. शासनाच्या ध्येयधोराणांशी सुसंगत शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक आदी घटकांच्या वाढीस प्रोत्सहन देणे.

अभियानाचा कालावधी

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या पूर्वतयारीसाठी 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 हा कालावधी निश्चित करण्यात आला असून सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. 5 ऑगस्ट 2024 रोजी अभियानाची सुरुवात होणार आहे. या अभियानाचा कालावधी एक महिना असून 4 सप्टेबर 2024 रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. 5 सप्टेबर 2024 ते 15 सप्टेबर 2024 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया होणार आहे.

अभियानाचे स्वरूप

या अभियानात सहभागी होवून एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी 33 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी 74 गुण, शैक्षणिक संपादणूकसाठी 43 गुण असे 150 गुणांच्या आधारे सहभागी शाळांचे कामगीरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

प्राथमिक स्तरावरील मूल्यांकन समिती- केंद्रप्रमुख-अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक – सदस्य, खाजगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक – सदस्य .

तालुकास्तरावरील मूल्यांकन समिती – संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती-अध्यक्ष, संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी-सदस्य, गटशिक्षणाधिकार-सदस्य, सेवाजेष्ठ विस्तारअधिकारी शिक्षण-सदस्य सचिव.

जिल्हास्तरावरील मूल्यांकन समिती – लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी-अध्यक्ष, प्राचार्य, जि.शि.व.प्र. संस्था मुरूड-सदस्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक-सदस्य, संबंधित उपशिक्षणाधिकारी-सदस्य सचिव .

पारितोषिक : या अभियानाअंतर्गत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळांना रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात येतील.

राज्यस्तर- पहिले पारितोषिके 51 लक्ष रुपये, दुसरे पारितोषिक 31 लक्ष रुपये, तिसरे पारितोषिक -21 लक्ष रुपये.

विभागस्तर- पहिले पारितोषिक 21 लक्ष रुपये, दुसरे पारितोषिक 15 लक्ष रुपये, तिसरे पारितोषिक 11 लक्ष रुपये.

जिल्हास्तर- पहिले पारितोषिक 11 लक्ष रुपये, दुसरे पारितोषिक 5 लक्ष रुपये, तिसरे पारितोषिक 3 लक्ष रुपये.

तालुकास्तर- पहिले पारितोषिक 3 लक्ष रुपये, दुसरे पारितोषिक 2 लक्ष रुपये, तिसरे पारितोषिक 1 लक्ष रुपये.

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, डायट प्राचार्य भागीरथी गिरी, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]