19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*कथा मंडपात शिवजयंती हर्षोल्लासात साजरी*

*कथा मंडपात शिवजयंती हर्षोल्लासात साजरी*

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्वितीय इतिहास अजरामर आहे

परम पूजनीय विद्यानंदजी सागर बाबा

कथामंडपात शिवजयंती हर्षोल्लासात साजरी

परमपूजनीय बाबाजींचा धर्मभूषण पुरस्काराने सन्मान

भारतभर दिव्य यज्ञ कर्म करणाऱ्या विद्वान ब्रह्मवृंदांचा सन्मान

लातूर ;दि. १९( वृत्तसेवा ) -गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक ,क्षत्रिय कुलभूषण, सिंहासनाधीश्वर ,राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आपण फक्त त्यांच्या जयंतीदिनी करतो ;तसेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त राजकारणापुरता करतो. परंतु हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्वितीय इतिहास अजरामर आहे.त्याच सतत स्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा )यांनी आपला प्रवचनातून केले.

  लातूर येथील श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समितीच्या वतीने पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या यज्ञ शाळेत श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायागाचे तसेच भव्य कथा मंडपात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे .कथेच्या सहाव्या दिवशी प्रवचनात पूजनीय बाबा बोलत होते. आज शिवजयंती आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून कथास्थळी शिवजयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित जनसागराने  ‘छत्रपती शिवाजी महाराज की’, ‘जय जय शिवाजी जय भवानी ‘असा जयघोष करून कथा मंडप डोक्यावर घेतले .
  पूजनीय बाबांची एन्ट्री आगळ्या-वेगळ्या पद्धतीने कथा मंडपात झाली. ढोल ताशे, लेझीमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत बाबा व भारतभरातून आलेले साधुसंत कथास्थळी आले .अग्रभागी भगवे फेटेधारी साधुसंत होते .फेटेधारी मावळे लेझीम नृत्य करीत ढोल -ताशाच्या गजरात पुढे पुढे सरकत होते. मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मातांचे वेशभूषा केलेले कलावंत घोड्यावर स्वार झाले होते  त्यानंतर पूजनीय बाबा व साधुसंत होते. सर्वात शेवटी गजराज होता. व्यासपिठावर बाबा व साधुसंत आल्यानंतर गजराजाने आपल्या सोंडेने बाबांना पुष्पहार घालून नमन केले .बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता यांच्या वेशभूषेतील कलावंतांचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केले.
    सहाव्या दिवशीच्या कथा समाप्तीनंतर व्यासपीठावर पैठण येथील शिवपुरी परिवाराच्यावतीने धर्मभूषण पदवी प्राप्त परमपूजनीय विद्यानंदजी सागर बाबा यांचा भारतभरात अखंडपणे दिव्य यज्ञ कर्म करणाऱ्या विद्वान ब्रह्मवृंदांच्या हस्ते वेदमंत्रात भगवी पगडी ,वस्त्र, पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. तसेच या अष्टोत्तर शत कुंडात्मक महायागामध्ये यज्ञ कर्म करणारे वेदशास्त्रसंपन्न कमलाकर गुरुजी (पैठण ),वेदशास्त्रसंपन्न दत्तात्रेय पोहेकर (पैठण),वेदशास्त्रसंपन्न नारायण देव सुलाखे (बीड) ,वेदशास्त्रसंपन्न महादेव शास्त्री जोशी (कोल्हापूर ),वेदशास्त्रसंपन्न अनंत खरे भट ,यज्ञ आचार्य सुरेश शिवपुरी यांचा संयोजन समितीच्या वतीने बाबांच्या हस्ते पगडी, सन्मानपत्र, वस्त्र ,पुष्पहार देऊन उचित सन्मान करण्यात आला .या कथेस दररोज भारतभरातून साधुसंत येत आहेत. आज अकोला येथून आलेले स्वामी सुरत गिरी महाराज, साध्वी सोनाली गिरीजी (अकोला ),स्वामी त्र्यंबकेश्वर नंदगिरीजी महाराज, स्वामी सुंदर गिरीजी महाराज, स्वामी कुबेर गिरीजी महाराज, स्वामी प्रेमानंदजी गिरीजी महाराज तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दिनकर गायकर आदींचा विशाल जाधव ,जगदीश तापडिया ,राजेश्वर बुके, दगडे पाटील आदींच्या हस्ते वस्त्र व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. द्वारकादास श्याम कुमार चे मालक तुकाराम पाटील, अंँड. कैलासराव देशपांडे विक्रमसिंग चौहान यांनी आज भागवत कथा ग्रंथाचे पूजन केले .

   बाबांनी आपल्या कथेचे पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पित केले .शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलताना ते म्हणाले की,” छत्रपती शिवाजी महाराजांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी स्वतःला वाहून घेतले होते .धर्म रक्षण व प्रसार करत असताना महाराजांनी दुसऱ्या धर्माची अवहेलना कधीही केलेले नाही. त्यांनी अनेक परंपरांना छेद दिला .अठरापगड जातीला, मावळ्यांना सोबत घेऊन या देशावरील आक्रमण परतवून लावले .अशा या धर्माचे पालन करणाऱ्या क्षत्रिय कुलावंस छत्रपती शिवाजी महाराजांचे सतत स्मरण भावी पिढीला करून देणे गरजेचे आहे”.

आजच्या बाबांच्या कथेला सांगीतिक साथ डॉ. बाबूराव बोरगावकर , विवेक चव्हाण( गायक), बळवंत पांचाळ आळंदी (तबलासात), अरुण पगारे (हार्मोनियम ), गणेश भोयर( गायक ), ब्रह्मानंद जाधव (तबला )यांनी साथ संगत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]