19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*पाचव्या दिवशीच्या श्रीमद् भागवत कथेस अलोट गर्दी*

*पाचव्या दिवशीच्या श्रीमद् भागवत कथेस अलोट गर्दी*

या देशात रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने रामा प्रमाणे आचरण करायला हवे

परम पूजनीय विद्यानंदजी सागर बाबा

पाचव्या दिवशीच्या श्रीमद् भागवत कथेस अलोट गर्दी

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद

लातूर; दि. १८ (वृत्तसेवा )- या देशात रामराज्य पुन्हा प्रस्थापित व्हावे अशी तमाम हिंदू प्रेमींची इच्छा आहे .अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी नंतर ही इच्छा पुढे येत आहे .यासाठी प्रत्येकाने स्वतःला बदलण्याची गरज आहे. प्रभू श्रीरामाप्रमाणे आचार – विचार आचरणात आणून प्रत्येकाने राम बनण्याचा प्रयत्न केला तरच हे शक्य आहे ,असे प्रतिपादन परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा )यांनी केले .

     लातूर येथील श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समितीच्या वतीने राजीव गांधी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात उभ्या करण्यात आलेल्या भव्य कथा मंडपात पूजनीय बाबांच्या अमोघ वाणीतील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे .दि. २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणाऱ्या या कथेस दिवसागणिक भाविकांची गर्दी वाढत आहे .हजारो स्त्री-पुरुष भावीक दररोज महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. ज्या ठिकाणी भागवत कथा आयोजित करायची त्या ठिकाणी अखंड अन्नदान करण्याचा बाबांचा आग्रह असतो. त्यानुसार संयोजन समितीच्या वतीने भोजन शाळेतून दररोज महाप्रसादाचे शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात येत आहे .यासाठी हजारो स्त्री-पुरुष सेवेकरी परिश्रम घेत आहेत.

    श्रीमद् भागवत कथेच्या पाचव्या दिवशीच्या प्रवचनात पूजनीय बाबांनी राम अवतार ,श्रीकृष्ण अवतार ,रामराज्य ,रासलीला, श्रीकृष्ण जन्मोत्सव आदीवर भाष्य केले. ते म्हणाले की ,”अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे ही या देशातील तमाम हिंदू प्रेमी नागरिकांची मागणी होती. ती पूर्ण झाली असून अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली आहे. या भव्य दिव्य सोहळ्यास देशभरातील साधुसंत उपस्थित होते. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत झालेल्या अविस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले .यावेळी रामराज्य प्रस्थापित व्हावे अशी तमाम साधुसंतांनी अपेक्षा व्यक्त केली होती ;याचा उल्लेख बाबांनी आपल्या प्रवचनात करून रामराज्य प्रस्थापित व्हायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या आचरणात बदल करायला हवा .राम कसे वागायचे ?त्यांचे आचार्य विचार कसे होते ?हे समजून घेणे गरजेचे आहे .केवळ रामनामाचा गजर केला जयघोष केला म्हणजे रामराज्य प्रस्थापित होणार नाही. हे कठीण काम आहे ,पण अशक्य देखील अजिबात नाही. यासाठी प्रत्येकाने राम बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे .या देशाला रामराज्याची ,रामाची गरज आहे. प्रभू रामचंद्र ,भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र  समजून घेण्याची  गरज आहे. भावी पिढीला राम, श्रीकृष्णाचा इतिहास समजावून सांगण्याची गरज आहे .अशा कथा -कीर्तनातून रामनामाचा जागर होत असतो, संकीर्तन होत असते. त्यामुळे कथा -कीर्तनाला महत्त्व आहे. केवळ  टाळ बडवण्यासाठी , नामजप यासाठीकथा कीर्तनाचे आयोजन केले जात नाही; यातून  संकीर्तन होऊन माणूस बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. समर्पित होऊन सेवा करण्याची, राष्ट्रनिष्ठा जागृत करण्याची उर्मी अशा कथा- कीर्तनातून पुढे येत असते .त्यामुळे एवढा अवाढव्य खर्च करून यज्ञ करण्याची ,कथा करण्याची गरजच काय ?असा सवाल उपस्थित करणे गैर व चुकीचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]