19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास चांगला प्रतिसाद*

*श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास चांगला प्रतिसाद*

हिंदू धर्म प्रगल्भ, गहन आहे ; धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी आपसातील हेवेदावे बाजूला सारुन एकत्र यावे

परमपूजनीय विद्यानंदजी सागर बाबा

आज कथास्थळी कृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार

लातूर ;दि 16 (वृत्तसेवा )-हिंदू धर्म प्रगल्भ, गहन आहे. हिंदू धर्मात प्रगल्भ तत्त्वज्ञान आहे .हिंदू धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी सर्वच जाती-धर्माच्या धर्म धुरंधरांनी आपसातील हेवे दावे, मतभेद बाजूला सारून एकत्र येणे गरजेचे आहे .जर आपण आप आपसात भेद करू लागलो तर भारत माता विश्वगुरू कशी बनेल ? भारत मातेची महती वाढवण्यासाठी सर्वप्रथम धर्म धुरंधरांनी एकत्र आले पाहिजे ,असे आवाहन परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा ) यांनी केले.

   श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समितीच्या वतीने मानव कल्याण एवं विश्वकल्याणासाठी लातूरमध्ये श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र  महायाग एवं श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे .आज कथेच्या तिसऱ्या दिवशी पूजनीय बाबांनी हिंदू धर्म ,देश सेवा, साधुसंतांचे महत्त्व समर्पण भाव आदीबाबत भाष्य करीत कथा रंगतदार केली. अनेक उदाहरणे देत त्यांनी धर्माला ग्लानी  येऊ नये यासाठी, धर्मकार्य ,धर्मप्रसार अव्यातपणे चालूच ठेवा असे कळकळीचे आवाहनही केले .

आपल्या आशीर्वचनात बाबा पुढे म्हणाले की ,हिंदू धर्म ,भारतीय परंपरा ,भारतीय संस्कृती अनादी अनंत आहे; तिचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे .हिंदू धर्माच्या उत्थानासाठी सगळ्यांनी समर्पित होणे गरजेचे आहे .धर्म ही बोलण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्ष आचरणाची गोष्ट आहे .तुम्ही धर्माचे रक्षण कराल तरच धर्म तुमचे रक्षण करील …धर्मो रक्षिती रक्षितः जेवढे प्रेम तुम्ही तुमच्या संसारावर ,मुला-बाळावर ,पत्नींवर करता तेवढेच प्रेम तुम्ही या देशावर ,धर्मावर ,परमात्म्यावर , गुरूंवर करता का ? असा सवाल उपस्थित करून, जेवढे प्रेम तुम्ही तुमच्या संसारावर, मुलाबाळांवर करता तेवढेच प्रेम जर तुम्ही या देशावर ,धर्मावर ,साधू- संतांवर ,गुरूंवर करायचा प्रयत्न केला तर भविष्यात कोणतीही समस्या उभी राहणार नाही.

   फार पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत होता असे म्हटले जायचे ;परंतु आपली धर्माप्रती ,राष्ट्रापती निष्ठा कमी झाली ,धर्माला ग्लानी आली तेव्हा परकीयांनी या देशावर आक्रमण केले . ही आक्रमण आपण परतवूनही लावली. भारत मातेला परम वैभव प्राप्त करण्यासाठी,या मातृभूमीला गत वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर प्रत्येकाने भारतीय बनण्याची, राष्ट्रप्रेमी नागरिक बनण्याची राष्ट्रनिष्ठा  वृद्धिंगत करण्याची, हिंदू धर्माप्रती नीतांत अभिमान बाळगण्याची गरज आहे. या धर्म कार्यासाठी आपण समर्पित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समर्पित व्हायला हवे असे आवाहनही परमपूजनीय विद्यानंदजी सागर बाबा यांनी आपल्या प्रवचनात केले.

बाबांना कथेमध्ये संगीत साथ  करणारे साथीदार यांनी  ‘जहा डाल डाल पर सोनेकी  बसती की चिडिया वह भारत देश है मेरा …जय भारती जय भारती… हे देशभक्तीपर गीत म्हटले तेव्हा  कथा मंडपातील स्त्री पुरुष भक्तीसागरात तल्लीन होऊन गेले.

आज कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार

शनिवारी कथेच्या वेळी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे वर्णन पूजनीय बाबा करणार असून यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी कथास्थळी रचना करण्यात आली आहे .उत्साहात आणि भक्ती भावाने हा सोहळा साजरा करण्यासाठी भाविक भक्तांनी आपआपल्या भारतीय वेशभूषामध्ये नटून -थटून यावे. तसेच सोबत दांडिया आदी खेळाचे साहित्य आणावे आणि हा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी उत्साहाने श्रीकृष्ण जन्म सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही पूजनीय बाबांनी यावेळी केले.

    यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष संजय बारजगे तसेच ह भ प महादेव महाराज बोराडे ,जनार्दन महाराज मेटे आदींचा सन्मान देखील संयोजन समितीच्या वतीने कथास्थळी करण्यात आला.  आजच्या कथेला भाविक -भक्तांची मोठी गर्दी होती .यात महिलांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]