लातूर/प्रतिनिधी: भाजपाच्या वतीने देश पातळीवर ‘गांव चलो’ अभियान राबविले जात आहे.लातूर शहर भाजपाच्या वतीनेही हे अभियान राबविले जात असून मान्यवरांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला.
लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देविदास काळे,अभियान संयोजक बाबू खंदाडे यांच्या यांच्या उपस्थितीत अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी शहर भाजपाचे अजित पाटील कव्हेकर, रवी सुडे,शिरीष कुलकर्णी, रागिनी यादव,विवेक बाजपाई,शिवसिंह शिसोदिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केंद्रातील भाजपा सरकारने मागील दहा वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती या अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे.ज्या घटकांना शासकीय योजनांचा लाभ अद्याप मिळाला नाही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.गाव- खेड्यातील प्रत्येक नागरिकाशी संपर्क साधता यावा,हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.या अभियानासाठी प्रवासी कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली असून हा कार्यकर्ता प्रत्येक बुथ स्तरावर पोहोचून विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार आहे.
शहर व परिसरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी केले आहे.