29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना कसलाही दिलासा नाही*

*अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना कसलाही दिलासा नाही*

कॉर्पोरेट टॅक्स कमी पण सामान्यांचा आयकर जशास तसा ठेवल्याने सामान्यांच्या पदरी निराशाच.

अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना कसलाही दिलासा नाही.

जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था होण्याकरिता कोणताही रोडमॅप नाही.

माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

लातूर ,दि.१ ( वृत्तसेवा) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा  सामान्यांच्या पदरी  निराशा पडली आहे. एका बाजूला कॉर्पोरेट टॅक्स 8 टक्क्यांनी कमी करण्यात आला परंतु सामान्य नागरिकांवरील आयकर स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. निवडणुकीच्या तोंडावर असतानाही जनतेला सुखावणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारला देता आला नाही अशी टीका लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली. तसेच फाईव ट्रिलियन इकॉनॉमीसह जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था करण्याबाबत यावर्षीच्या अर्थसंकल्पातून कोणताही रोडमॅप आखण्यात आला नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आज केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर मत व्यक्त करताना लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या अर्थसंकल्पाकडून देशातील नागरिकांना फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असून येणाऱ्या काही दिवसांत देशातील सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असल्याने  सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची संधी सरकारने गमावली आहे अशी टीका व्यक्त केली.

 या अर्थसंकल्पातून युवा उद्योजक, कृषी, शिक्षण, अशा क्षेत्रांकरिता नवीन कोणतीही योजना आखण्यात आली नाही. याउलट कॉर्पोरेट कर ३० टक्के वरून कमी करत २२ टक्के करण्यात आला मात्र सामान्य नागरिक जो आयकर भरतात त्याच्या स्लॅब मध्ये कोणताही बदल न केल्याने सामान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आयकर स्लॅब मध्ये वाढ करून किमान ९ लाखांची मर्यादा आखली जावू शकेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची होती मात्र ती पूर्णपणे निष्फळ ठरली. यामुळे सामान्य नागरिकांपेक्षा केंद्र सरकार उद्योगपती यांचा अधिक विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करून फाईव ट्रिलियन इकॉनॉमीचे लक्ष गाठत जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था करण्याबाबत केवळ घोषणा वारंवार केंद्र सरकार कडून करण्यात येतात पण त्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पातून कोणताही रोडमॅप आखण्यात आला नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कृषी क्षेत्रात खते, बियाणे यांच्या किंमती देखील कमी करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे शेतकर्यांचा उत्पादक खर्च वाढलेलाच राहणार आहे. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना उत्पादन खर्च मात्र वाढत आहे त्यामुळे शेतकरी भरडला जात आहे. या अर्थसंकल्पातून युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबाबत कसलाही ठोस कार्यक्रम सरकारने हाती घेतला नाही त्यामुळे भविष्यात नवीन स्टार्ट अप यांची संख्या घटताना दिसून येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. एकंदरीतच मोठ्या उद्योगपतींना दिलासा तर सामान्य नागरिकांच्या पदरी निराशाच देणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे केली.

मुलींच्या लसीकरण वगळता अर्थसंकल्पात काहीच नाविन्य नाही.

विक्रांत गोजमगुंडे 

देशाच्या अर्थसंकलपातून सामान्य नागरिकांना फारसा दिलासा मिळाला नसला तरी वय वर्ष ९ ते १४ मधील मुलींना कर्करोग पासून संरक्षण देण्याकरिता जाहीर करण्यात आलेला  लसीकरण कार्यक्रम कौतुकास्पद असला तरी याची केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]