इचलकरंजी : प्रतिनिधीअयोध्येत श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त इचलकरंजी भाजपाच्या वतीने दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.तत्पूर्वी , दुपारी शहरातील विविध चौकासह मुख्य मार्गावर प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करुन दर्शन घेण्यात आले.तर काही मंडळांनी विविध वाद्यांच्या गजरात प्रभू रामचंद्रांची भव्य मिरवणूक काढत हा धार्मिक सोहळा आणखी व्दिगुणित केला.यानिमित्ताने भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम, प्रसाद वाटप कार्यक्रमांचेही आयोजन केल्याने सर्वञ भक्तिपूर्ण व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.सायंकाळनंतर घरोघरी दीप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने संपूर्ण वस्ञनगरी प्रकाशाने उजळून निघाली होती.दरम्यान , भाजपाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर दीपोत्सव साजरा केला.यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर , वस्ञोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी ,तानाजी पोवार ,मनोज हिंगमिरे , दिलीप मुथा ,उमाकांत दाभोळे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.