39.4 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeठळक बातम्या*नववर्षाचे सेलिब्रेशन:लातूर पोलिसांची कारवाई*

*नववर्षाचे सेलिब्रेशन:लातूर पोलिसांची कारवाई*



लातूर*दिनांक 01/01/2024*( वृत्तसेवा)-नववर्षानिमित्त लातूरमध्ये रात्रभर पोलिसांचा चोख बंदोबस्त; मद्यपी चालकांवर कारवाई. कोंबिंग ऑपरेशन व ठिकठिकाणी नाकाबंदीचे करण्यात आली होती. 52 अधिकारी व 500 पोलीस अमलदार 200 होमगार्डचा तगडा बंदोबस्त. ठेवण्यात आला होता.नववर्षाचे स्वागत करताना कायद्याचे उल्लंघन करणार्या अनेक मद्यपान करणार्या व्यक्तीवर लातूर पोलिसांनी कारवाई केली.

          मावळत्या वर्षाला निरोप अन्‌ नववर्षाचे स्वागत रविवारी (ता.31) मध्यरात्रीला शहरात जल्लोषात आणि दणक्यात करण्यात आले. रविवारी शहरासह जिल्ह्यात पार्ट्यांची रंगत वाढली.
         सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यसेवनासह नियम मोडणाऱ्यांचा लातूर पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आली.जागोजागी नाकाबंदी व संपूर्ण जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा सुरू झालेली ही तपासणी पहाटेपर्यंत कायम होती.

अतिमद्यसेवन केलेल्या वाहनचालकांना थेट ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस केल्याने अनेकांची नशाच उतरली.

      कोंबिंग ऑपरेशन दरम्यान

👉🏿जिल्ह्यात एकूण 40 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.
👉🏿रविवारी (ता.31) पहाटेपर्यंत 1,658 वाहनांची तपासणी करण्यात आली.
👉🏿 78 मद्यधुंदावस्थेतील वाहनचालकांवर कारवाई केली गेली.
👉🏿 1124 वाहन चालकावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये खटले दाखल करण्यात आले आहेत.
👉🏿 तसेच ओवर स्पीड चे 50 केसेस करण्यात आले आहेत.
👉🏿जिल्ह्यातील 72 हॉटेल व लॉज चेक करण्यात आले.
👉🏿विविध गुन्ह्यात फरार व पाहिजे असलेल्या 44 आरोपींना तपासण्यात आले.
👉🏿दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या 3 इसमावर कलम 122 अन्वये कारवाई करण्यात आली.
👉🏿कोंबिंग ऑपरेशन व नववर्ष बंदोबस्तासाठी लातूर जिल्ह्यातील एकूण 13 वरिष्ठ अधिकारी तसेच 52 पोलीस अधिकारी 500 पोलीस अमलदारसह, 200 होमगार्ड, यांचा प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय स्थानिक गुन्हे शाखा, 112 डायल, चार्ली मोटरसायकल पेट्रोलिंग, दामिनी पथकची गस्त सुरू होती.
मद्यपी आणि रात्री गोंधळ घालणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनी अटकाव केला. रात्री आठपासून शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली.
प्रत्येक चारचाकी आणि संशयित दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात आली. अतिप्रमाणात मद्यप्राशन केल्याचा संशय आलेल्या व्यक्तीं वर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षकाकडून भेटी.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी रात्री विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकाबंदीच्या पॉइंटवर प्रत्यक्ष भेट देत पाहणी करून मार्गदर्शन व सूचना केल्या. तसेच लातूर पोलिसांनी रात्रभर चोख बंदोबस्त केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे अनुचित व अप्रिय घटना घडली नसून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी वारलेस वरून बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी व अमलदारांचे कौतुक करून नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]