लातूर *दिनांक 03/12/2023*( वृत्तसेवा )-' एक धाव व्यसनमुक्तीसाठी 'ही टॅगलाईन घेऊन लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस लातूरमध्ये अबभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला .हजारो तरुण-तरुणी या मॅरेथॉनमध्ये धावले .लातूर पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या "एक धाव व्यसनमुक्तीसाठी" या शीर्षकाखालील मॅरेथॉन स्पर्धेत हजारो लातूरकरांनी सहभाग घेऊन धावले व स्पर्धा यशस्वी केली.
तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचे प्रमाण थांबविण्यासाठी व त्या संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता लातूर पोलिसां कडून आज दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 05 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गुगल फॉर्म ची लिंक पोलीस दलाकडून प्रसारित करण्यात आली होती. यात 6 हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवून बक्षिसे पटकावली.
स्पर्धेच्या सुरुवातीस 10 किलोमीटर स्पर्धा प्रकारास जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनमोल सागर, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यानंतर 05 कि. मी. व 03 कि मी प्रकारातील स्पर्धकांना सोडण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
10 किलोमीटर पुरुष गट
प्रथम- बोंबले छगन मारुती (नांदेड)
द्वितीय – तुषार भालसिंग मच्छिंद्र (अहमदनगर)
तृतीय- चौगुले आर्यन आकाराम (सांगली)
10 किलोमीटर महिला गट
प्रथम-अश्विनी मदन जाधव (परभणी)
द्वितीय- वैभवी विजय खेडकर (अहमदनगर)
तृतीय- पुष्पा सुभाष राठोड (लातूर)
05 किलोमीटर पुरुष गट
प्रथम-लवाडे विष्णू विठ्ठलराव (नांदेड)
द्वितीय-घुमरे दशरथ तुकाराम (सांगली) तृतीय-गुडेगाव निवृत्ती प्रल्हाद (लातूर)
05 किलोमीटर महिला गट
प्रथम-मेहेत्रे निकिता विठ्ठल (परभणी)
द्वितीय-खेडकर वैष्णवी विजय (अहमदनगर)
तृतीय- हेकरे परिणीता प्रवीण (अहमदनगर)
03 किलोमीटर पुरुष गट.
प्रथम- पवार अक्षय शिवाजी
द्वितीय- मडावी नरेश
तृतीय-कांबळे गौरव गोविंद
03 किलो मीटर महिला गट
प्रथम-येलाले प्रणवी मारुती
द्वितीय-ढोले प्रतीक्षा सुरेश
तृतीय-मौजम फरहाणा कलीम

याप्रमाणे विजयी झाले असून 10 व 05 कि. मी. मॅरेथॉन मध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना अनुक्रमे 10 हजार, 05 हजार व 03 हजार रुपयाचे रोख बक्षिसे, मेडल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सदर मॅरेथॉन मध्ये लातूर पोलिसांकडून अतिशय उत्तम व्यवस्थापन करण्यात आले होते. यामध्ये फूड पॉकेट्स, एनर्जी ड्रिंक्स, पाणी बॉटल्स, केळी तसेच वैद्यकीय पथक, फिजिओथेरपी पथक, ॲम्बुलन्स यांची व्यवस्था करण्यात आली होती.
सदर स्पर्धेकरिता कीर्ती ऑइल मिल, द्वारकादास श्यामकुमार ग्रुप, सनरिच, ब्रिज रेस्टॉरंट, अरिहंत ऑइल ग्रुप, यांनी सहकार्य व मदत केली. इव्हेंट मॅनेजमेंट युनिक उत्सव ग्रुपचे लक्ष्मण सुरवसे यांनी तर झुंबा व वार्मप साठी सोहेल शेख व प्रीती मिसाळ या दोन ग्रुपने काम केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सूळ यांनी केले.
कोरोना महामारी पासून अशा प्रकारची मोठी व भव्य दिव्य अशी स्पर्धा प्रथमच लातूर शहरात आयोजित करण्यात आल्यामुळे स्पर्धेस सर्व वयोगटातील महिला व पुरुष यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
मॅरेथॉन कालावधीत लातूर शहरातील स्पर्धा मार्गावरती विविध शाळांतील जवळपास 01 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन व्यसनमुक्ती चे फलक घेऊन जनजागृतीचे काम केले. तसेच स्पर्धा मार्गावरती विविध ठिकाणी संगीत व म्युझिक ग्रुप्सनी भाग घेऊन स्पर्धकांचे व नागरिकांचे मनोरंजन केले.
या पुढील काळात प्रत्येक वर्षी अशीच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे बाबत उपस्थित स्पर्धक व नागरिकांनी मागणी केली असता पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
सदर स्पर्धेत लातूर शहरातील विविध सायकलिस्ट व मॉर्निंग वॉकिंग ग्रुप्स, दिव्याग ग्रुप तसेच विविध सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदविला.
सदर मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक श्री अजय देवरे यांचे अधिपत्याखाली टीम मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम व नियोजन करून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.