प्रासंगिक
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा असा चार सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील शेवटचे टोक लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर इंडस्ट्रीज ने डोंगराळ भाग असलेल्या उजाड माळरानावर १२ वर्षापूर्वी साखर कारखाना सुरु केला अन् या भागांतील शेतकरी, उस उत्पादक व्यापारी यांना चांगले दिवस आलेले दिसुन येत आहेत चलन वाढले बाजारपेठ फुलली एकेकाळी हा भाग दुष्काळी ,आवर्षन, कुठलाच रोजगार नसलेला हा भाग अविकसित होता माञ जागृती शुगर मुळे आज शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडली येवढेच नाहीं तर स्थानीक लोकांना रोजगार मिळाला चलन बाजारात आले बाजारपेठ फुलली त्यामुळें देवणी तालुक्यातील तळेगाव सहित आजूबाजूला असणारी ५० गावे अविकसित भाग असलेले आता विकासाच्या ट्रॅकवर आल्याने यामुळें विकासभिमुख देवनी तालुका दिसून येत आहे .
जागृती शुगर चे ब्रीद वाक्य आहे जागृती सर्वांची प्रगती या म्हणीप्रमाणे १२वर्षाचा चढता आलेख पाहता या भागांत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच या भागातील लोकांना या साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे रोजगार , व्यवसाय वाढला लोकांचे पक्के घर झाली शेतकऱ्यांची मूल उच्च शिक्षण घेत नोकरीवर लागले या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुलजी भोसले देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या सूचनेनुसार सुरु असलेल्या जागृती शुगर ने मागच्या ११ वर्षात विक्रमी गाळप करत एफआरपी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या राज्यातील टॉप २ खाजगी साखर उद्योगात जागृतीचे शुगरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते आज जागृती शुगरचा १२ वा गाळप हंगाम सुरू होत आहे त्याबद्दल कारखान्याच्या प्रगतीच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा मांडन्याचा प्रयत्न करीत आहे.
दिलीपराव देशमुख साहेब यांनी दिलेला शब्द पाळला अन् या भागाचं भाग्य उजळले
देवणी तालुका लातूर जिल्ह्यातील शेवटचं टोक लोकनेते विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना या भागाकडे विशेष लक्ष घातले पाण्याची गरज बघून या भागात शेततळे साठवण तलाव मंजुर केले या भागात सिंधिकामठ बरेज बांधले पाणी भरपूर झाले पण इथल्या शेतकऱ्यांना साखर कारखाना नव्हता हे शल्य कायम लोकांच्या मनात राहायचे २००९ साली राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी २००९ साली लोकसभा निवडणुकीसाठी कॉर्नर बैठका जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी १२५ प्रचार सभा बैठका घेतल्या लोकांचें काय प्रश्न आहेत हे समजून घेतले मला अजूनही आठवतय देवणी तालुक्यातील बोरोळ दवणहिप्पर्गा, देवणी वलांडी, जवळगा इथे रात्रीं उशिरा सभा बैठका झाल्या सगळीकडे एकच मागणी दिलीपराव देशमुख साहेब तुम्ही आम्हाला सगळ दिलंय आता आम्हाला साखर कारखाना द्या विलासराव देशमुख साहेब यांनी पान्याची सोय केली तलाव मंजुर झाली त्यावेळीं दिलीपराव देशमुख साहेब यांनी या भागांतील लोकांना साखर कारखाना सुरु करू असा शब्द दिला तो त्यांनी पाळला आज देवणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम या साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेले आहे या भागातील लोकांना जागृती शुगर म्हणजे शेतकऱ्यांचे मंदिर असल्यासारखे वाटते इथे वेगळा आनंद वाटतोय सुजलाम सुफलाम करण्याचे काम झाले आहे परिसरात नावीन्यपूर्ण बदल झालेला आहे याचे सर्व श्रेय राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कडे जाते.
शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती व्यापारपेठ वाढली
जागृती शुगर मुळे या भागातील देवणी तालुक्यातील वलांडी देवणी, निलंगा , शिरूर अनंतपाळ, उदगीर,कर्नाटक मधील कमालनगर, हुलसुर,बसवकल्याण येथील बाजारपेठ फुलली पैसा बाजारात फिरतोय आर्थिक विकासाला चालना मिळाली आज या वलांडी येथून हैदराबाद बिदर इथपर्यंत बसेस धावतात पूर्वी कमी वर्दळ असलेलं वलांडी बसस्टँड आता मोठे व्यापार ठिकाण झालेले दिसत आहे महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर असलेली मोठी बाजारपेठ बनली आहे हे केवळ जागृती शुगर कारखान्यामुळे चलन वाढले शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता मिळाली
११ गाळप हंगामात ५२ लाख ३७ हजार मेट्रिक टनाचे गाळपतर १२३७ कोटि रुपये उस उत्पादक शेतकऱ्यांना अदा*
जागृती शुगर ने मागच्या ११ गाळप हंगामात तब्बल ५२ लाख ३७ हजार मेट्रिक टनाचे यशस्वी गाळप करत उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देत १२३७ कोटी रुपये अदा केले आहेत
एफआरपी पेक्षा ७७ कोटी रुपये जागृती शुगरने जास्तीचे दिले
मांजरा साखर परिवारातील साखर कारखाना असल्याने लोकांच्या अपेक्षा अधिक भाव मिळतो असे लोकांच्या मनात कायम घर केलेल्या मांजरा साखर परीवाराबद्दल आहेत त्यामुळे परिवाराच्या बरोबरीने त्यापेक्षा अधिक जास्त भाव देण्याचा प्रयत्न या कारखान्याने केला आहे आजतागायत एफ.आर.पी पेक्षा जास्तीचे ७७ कोटी रुपये उस उत्पादक शेतकऱ्यांना जागृति शुगर ने दिलेली आहेत.
को जनरेशन प्रकल्पातून २२ कोटी २५ लाख युनिट वीज एक्सपोर्ट
शेतकऱ्यांना अधिक भाव देता यावा यासाठी कारखान्याने को- जन प्रकल्प सुरू असून त्या प्रकल्पा द्वारें आजतागायत २२ कोटी २५ लाख युनिट वीज महावितरण कंपनीकडे एक्सपोर्ट केली आहे
डिस्टलरी प्रकल्प
कारखान्याने ११० klpd क्षमतेचा डिस्टलरी प्रकल्प उभारणी केली असून त्यासाठी स्वनिधी १३ कोटी व बँकेकडून १११ कोटी रुपये कारखान्याने घेतले आहे त्या कर्जाचा हप्ता डिस्टलरी च्या नफ्यातून २८ कोटी ४२ लाख रुपये बँकेची वेळेत कर्ज परतफेड केली आहे
बी आय ओ सी एन जी प्रकल्पाची उभारणी सुरू
जागृती शुगर कारखान्याने काळाची गरज ओळखून बी आय ओ सी एन जी प्रकल्प उभारणी सुरू केली असून लवकरच हा प्रकल्प सुरू होईल या नवीन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव तर मिळेलच पण या भागातील लोकांना अधिक आर्थिक सुबत्ता मिळेल लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न जागृती शुगर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून होणार आहे एकंदर या जागृती शुगर इंडस्ट्रीजमुळे गेल्या ११ वर्षात देवणी, शिरूर अनंतपाळ उदगीर, निलंगा तालुक्यातील प्रत्येक गावात आर्थिक क्रांती बघायला मिळत आहे बाजारपेठ फुलली लोकांना रोजगार मिळाला आर्थिक मदत झाली हे जागृती शुगर मुळे त्यामुळें जागृती ही शेतकऱ्यांच्या प्रगती बरोबर व्यापार वाढला रोजगार मिळाला चलन बाजारात फिरत आहे आर्थिक विकासाला चालना मिळाली जागृती शुगरमुळे या भागातील लोकांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडली आहे हे माञ निश्चित..
हरिराम कुलकर्णी
जेष्ठ पत्रकार लातूर..