लातूर ( वृत्तसेवा ) –लातूर जिल्ह्यातील गंगापूर येथील बाबू हणमंतराव खंदाडे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्रच्या प्रदेश सचिव म्हणुन निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्रच्या प्रदेश अध्यक्ष संजय गिते यांनी हि निवड केली असून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार केली आहे.

या निवडीबद्दल माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर भय्या, आमदार रमेशअप्पा कराड. आमदार अभिमन्यु पवार, माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख, लातूर शहर जिल्हा अध्यक्ष देविदास काळे यांनी अभिनंदन केले आहे, बाबुराव खंदाडे यांनी यापुर्वी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजप जिल्हा उपाध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र आदि पदावर काम केले आहे.या निवडी बद्दल सर्व सामान्य कार्यकर्त्यामधुन आनंद व समाधान व्यक्त होत आहे.