मुंबई -नवी मुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्स मध्ये नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा लाभ रहिवासी तसेच विशेष म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला,सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी घेतला.या शिबिरात एकूण १०२ जणांची तपासणी करण्यात आली.त्यात २४ जणांचे इसिजी काढण्यात आले.त्यापैकी ८ जणांना अधिक तपासणीसाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.तसेच डोळ्यांची ही तपासणी करण्यात येऊन,ज्यांना गरज आहे, अशांना त्वरित चष्मे वाटप करण्यात आले.

हे आरोग्य शिबिर लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.क्लब च्या अध्यक्षा सौ अलका भुजबळ यांनी शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.