लातूर,दि.19 ः मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे 23 तासात हाडांमध्ये स्क्रु बसवून ताबडतोब सिरॅमीकचे दात बसवण्याची सोय लातूर शहरातील योगेश्वरी डेंटल क्लिनीकमध्ये उपलब्ध झाली आहे.
दंत क्षेत्रात रोज नवनवीन क्रांती, उपकरण आणि उपचार पद्धती येत आहेत. त्यातच कृत्रिम दंत रोपण ही पद्धत खुपच रुजू होत आहे. कृत्रीम दंत रोपण करुन दात बसवणे ही एक उत्तम उपचार पद्धती आहे. सध्या जगात सर्वत्र हे उपचार वेगाने वाढत आहेत आणि प्रगत होत आहेत.
‘जे नविन ते लातुरला हवे’ बेसल इम्प्लांट्स ही इम्प्लांटोलॉजीची आधुनिक प्रणाली आहे. जी दंत प्रत्यारोपण ठेवण्यासाठी जबड्याच्या हाडांच्या बेसल कॉर्टिकल भागाचा वापर करते, ज्याची रचना बेसल कॉर्टिकल हाडांच्या क्षेत्रांना सामावून घेण्यासाठी केली जाते. इम्प्लांट लोड मुक्त बेसल हाडांमध्ये सुरक्षितपणे प्रसारित केले जात आहे, तर पारंपारिक मूळ स्वरूपात, जीवाणूंचा हल्ला होऊ शकतो. पेरी-इम्प्लांट संक्रमणाची शक्यता कमी असते कारण बेसल इम्प्लांटमध्ये इम्प्लांटची पृष्ठभाग पॉलिश केली जाते.
रुग्णाच्या अल्व्होलर हाडांची आवश्यकता असते आणि हाडांच्या वाढीची आवश्यकता नसते. सर्व रूग्णांमध्ये पुरेशी बेसल हाड असते, जरी उभ्या उंची कमी झाल्या तरीही. उपचारांचा कालावधी देखील कमी होतो. बेसल इम्प्लांटमध्ये तात्काळ लोडिंग करता येते. कोणतीही dentulous अवस्था नाही आणि तत्काळ दातांची गरज नाही. दात नियमितपणे संक्रमित असले तरीही एक्स्ट्रक्शन आणि इम्प्लांट प्लेसमेंट एकाच भेटीत केले जाऊ शकते.
डॉ. लक्षण मालकुंजे (एम डी एस (पुणे), डॉ. सुशीन गाजरे (एम डी एस), डॉ. आनंद अंबेकर (एम. डी. एस.) यांच्या टिम ने 23 तासात इम्प्लांट (स्क्रु) बसवून सिरॅमीक दात बसवण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून यात त्यांना पूर्णपणे यश आले आहे. या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 72 तास लागत असे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला खूप महत्व आहे आणि या उपचाराने वेळेची बचत होते. तसेच रुग्णाला समाधान मिळते आणि सोशल प्रॉब्लेम येत नाही कारण दात नाही तर खाणे नाही, बोलणं, हसणं, फिरण नाही. यावर हा उपचार थोडा खर्चिक असला तरी रिझल्ट लगेच मिळतो आहे. या उपचारात कमी प्रमाणात त्रास होतो. यामध्ये बेसल ईंप्लांट बसवले जातात आणि लगेच दात बसवता येतात यामुळे दंत वैद्यकीय क्षेत्रात लातूर जिल्ह्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.